फिर एक बार मोदी सरकार – प्रणव परिचारक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फिर एक बार मोदी सरकार – प्रणव परिचारक

भारतीय जनता पार्टीच्या “गाव चलो अभियान” अंतर्गत प्रणव परिचारक यांनी पांढरेवाडी या गावात प्रवास केला. पांढरेवाडी गावात विविध क्षेत्रातील नागरिकांसह महिला शेतकरी तरुण वर्गाच्या गाठी भेटी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनते प्रति असलेल्या योजनांचा आणि कार्याचा जागर केला.

पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी या गावांमध्ये प्रणव परिचारक यांचे आगमन होताच फटाक्याच्या आकाशबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून त्यांच्या गावात स्वागत केले. यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनते प्रती सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती आणि माहिती पत्रके प्रणव परिचारक यांनी नागरिकांकडे दिली. लोकपयोगी योजना या जनतेचे आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतील अशा योजना मोदी सरकारने आणले आहेत. मोदींची गॅरंटी हेच विकासाचे सूत्र आहे. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता यांनी समर्थ भावनेने काम करत असताना नागरिकांनी देखील देशाप्रती समर्पणाने काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा. असे आवाहनही यावेळी परिचारक यांनी केले.

पांढरेवाडी गावामध्ये परिचारक यांनी गावातील मान्यवर व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, सर्वसामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधला. नागरिकांनी आपल्या गावातील काही समस्यांची निवेदने, पत्रके व कैफियत परिचारक यांच्यापुढे मांडल्या. या सर्व सूचना कैफियत यांचा पाठपुरावा लवकरच केला जाईल असेही त्यांनी अस्वस्थ केले.

ह्या बैठकीत नमो एप डाउनलोड, बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे व जनता व्हाट्सएप्प ग्रुप तयार करणे, बूथ समित्यांची तयारी अश्या अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. ह्या वेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जेष्ठ मार्गदर्शक मंडळी, कार्यकर्ता बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here