‘फायर है मै’ म्हणायला येतोय ‘पुष्पा २’; या दिवशी मोठ्या पडद्यावर धमाका करणार अल्लू अर्जुन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

‘फायर है मै’ म्हणायला येतोय ‘पुष्पा २’; या दिवशी मोठ्या पडद्यावर धमाका करणार अल्लू अर्जुन

Pushpa 2 Release date- साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याची रिलीज डेट जाहीर झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

अल्लू अर्जुनला नुकताच भारत सरकारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केला.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा २०२१ चा संपूर्ण भारतातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा २०२१ चा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता. त्यामुळे संपूर्ण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दबदबा निर्माण केलेला. त्यामुळे लोक या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. मध्ये शूटिंग सुरु झाल्याच्याही बातम्या येत होत्या. त्यामुळे चाहते या दुसऱ्या भागाची कथा अशी असेल… तो कोणत्या दिवशी प्रदर्शित होईल या सर्व गोष्टींचा वेगवेगळया प्रकारे अंदाज लावत होते. यानंतर निर्मात्यांनी फहद फासिल आणि अल्लू अर्जुनचा लूकही समोर आणला होता. आता त्याची खरी रिलीज डेट समोर आली आहे. तेलुगू चित्रपट उद्योगातील पॅन इंडिया चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ पुढील वर्षी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या बातमीमुळे अल्लू अर्जूनसोबतच त्याच्या चाहत्यांनाही आनंदाचा धक्का बसला होता. यासंदर्भातले सर्व फोटो आणि व्हिडिओही समोर आले. आता ताज्या अपडेटनुसार, अल्लू अर्जुनचा पुष्पा २ हा चित्रपट २०२४ मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘पुष्पा २’ पुढील वर्षी २२ मार्च २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

आपल्या अधिकृत हँडलवर अल्लू अर्जुनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने ‘पुष्पा २’ चा सेट दाखवला. तसेच त्याचे घरही दाखवले. अभिनेत्याने त्याच्या संपूर्ण दिनचर्याबद्दल सांगितले. त्यात त्याने झोपेतून उठल्यानंतर तो काय करतात? हे दाखवले. तसेच रोज दुपारी १ वाजता तो घरच्यांशी बोलतो. रामोजी फिल्मसिटीमध्ये बांधलेल्या सेटवर पोहचताना तो चाहत्यांशी संवादही साधतो. मग सेटवर पोहोचल्यावर तो तयार होतो. आपला पोशाख घालून मेकअप वगैरे करतो. मग त्याला स्क्रिप्ट वाचून दाखवली जाते. त्यानंतर तो सेटवर जातो. दिग्दर्शक सुकुमार, यांच्यासोबत तो गेली २० वर्षे काम करत आहेत. ते अभिनेत्याला त्यांचे पहिले प्रेम देखील म्हणतात. एक सीन देखील शूट करण्यात आला आहे ज्यामध्ये अल्लू अर्जुन चंदनची लाकडे लॉरीमध्ये आपल्या स्टाईलमध्ये ठेवताना दिसत आहे.

पुष्पा 2′ चे पोस्ट प्रोडक्शन लवकरच सुरू होणार

दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांची संपूर्ण टीम ‘पुष्पा २: द रुल’ चे शूट काही आठवड्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. टीम अॅक्शन फिल्मसाठी पोस्ट-प्रॉडक्शन शेड्यूलची देखील योजना करत आहे, जे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात चंदनाच्या तस्करीची संपूर्ण कथा नाटकाच्या रूपात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि शेवटी फहद फासिलच्या एंट्रीने कथेत मसाला टाकला जाईल. पार्ट २ ची कथा अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यातील भांडणापासून सुरू होईल.

‘पुष्पा २’ धमाकेदार असेल

टीमने दुस-या भागाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर ‘पुष्पा २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा अधिकृत टीझरही प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी, प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने सांगितले की ‘पुष्पा’ फ्रँचायझीचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा मोठा आणि चांगला असणार आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक सुकुमार यांनी आपल्या प्रेक्षक वर्गाला खिळवून ठेवण्यासाठी स्क्रिप्टवर बरेच काम केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here