पोलीस व जनतेकरीता स्टेट बँक ऑफ इंडिया चे ए.टी.एम. सेंटर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पोलीस अधिकारी अंमलदार व त्याचप्रमाणे सोलापूरातील नागरिकांना गांधी नगर परिसरात कोणत्याही बँकेचे ए.टी.एम. सेंटर उपलब्ध नसल्याने गैरसोय होत होती.
गैरसोय दुर करण्याच्या दृष्टिने पोलीस कल्याण योजनेच्या माध्यमातून आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने पोलीस आयुक्त कार्यालय येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे नविन ए.टी.एम. सेंटर उघडून कार्यान्वित करुन पोलीस आणि जनतेची गैरसोय दुर करण्यात आली असुन त्याअनुषंगाने दिनांक ०३/०२/२०२२ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर शहर येथे नविन ए.टी.एम. सेंटरचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त श्री. हरीश बैजल यांचे हस्ते संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी प्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर श्री. राजीव किशोरी गुप्ता, सोलापूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक श्री. राजेंद्रकुमार शिंदे त्याचप्रमाणे पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय),
सौ. डॉ. दिपाली धाटे,  पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे/विशा), श्री. बापुसाहेब बांगर, तसेच सहा.पोलीस आयुक्त,(प्रशासन) श्रीमती प्रांजली सोनवणे,
सहा. पोलीस आयुक्त श्री. परमार यांचेसह इतर
पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here