पोलीस आयुक्त बैजल यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर चे नूतन पोलीस आयुक्त हरिष बैजल यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार अक्षय बबलाद सिद्धार्थ भडकुंबे सतीश गडकरी रिजवान शेख इम्तियाज अक्कलकोटकर इस्माईल शेख प्रसाद ठक्का राम हुंडारे प्रदीप पेदापल्लीवार श्रीनिवास वंगा शिवराज मूगळे अक्षय रणखांबे सूर्यकांत व्हनकडे नागनाथ गणपा रोहित घोडके इत्यादी पत्रकार उपस्थित होते
पत्रकारांवर अन्याय होणार नाही- पोलीस आयुक्त
नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या सत्कार प्रसंगी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी हल्ली विना चौकशी पत्रकारांवर सरकारी कामात अडथळा (भा द वी 353)तसेच खंडणी सारखे गुन्हे दाखल होत असून असे गुन्हे दाखल करण्यापूर्वी योग्य ती चौकशी करायला हवी अशी मागणी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याकडे केली असून खोटे गुन्हे दाखल झाल्याने पत्रकारांची बदनामी तसेच मनोबल खचून जात असल्याची भीती व्यक्त केली असता पत्रकारांवर अन्याय होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना दिली आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here