पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

देशातील जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त झालेली असताना जनतेला आधार देण्याऐवजी मोदी सरकार स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यात मग्न आहे. जनता जगली काय किंवा मेली काय याच्याशी त्यांना काडीमात्र घेणेदेणे नाही. महागाईच्या आगडोंबात जनतेला होरपळवणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात आज बुधवार दिनांक 14 जुलै 2021रोजी कॉंग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, अरुण शर्मा, नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, नगरसेविका अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, सेवादलचे अशोक कलशेट्टी, भीमाशंकर टेकाळे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते, तिरुपती परकीपंडला, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, प्रवक्ते नागनाथ कदम, युवक कार्याध्यक्ष युवराज जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, अनिल मस्के, हारून शेख, उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष विवेक कन्ना, सूर्यकांत शेरखाने, अनुपम शहा, सुशील बंदपट्टे, श्रीधर काटकर, उपेंद्र ठाकर, नूर अहमद नालवार, मनोज दरेकर, सोमनाथ व्हटकर, संजय गायकवाड, राहुल बोळकोटे, प्रियांका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरू, हरिष गायकवाड, महेशकुमार मस्के, मोनिका सरकार, सुभाष वाघमारे, अभिषेक गायकवाड, अंबादास गायकवाड, शिवा म्हेत्रे, VD गायकवाड, सोपान थोरात, श्रीकांत दासरी, चंद्रकांत टिक्के, प्रशांत गायकवाड, वेदभाऊ म्हेत्रे, अनिता भालेराव, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
ह्या स्वाक्षरी मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here