सोलापूर // प्रतिनिधी
पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पोलिस आयुक्त श्री. हरीश बैजल साहेबांना नवरात्र उत्सवातील विविध समस्या व अडचणी बाबत संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमुपरी (महाराज) व उत्सव समिती अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
मा. पोलिस आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरात विशेष करून पूर्व विभागात नवरात्र हा सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. पण गेल्या 2 वर्षापासून कोरोना संकटामुळे शासनाचे कोरोना नियमांचा आधिन राहून सर्व नवरात्र सार्वजनिक मंडळ व नागरिकांनी नवरात्र उत्सव साजरा केला आहे. यंदा ही तीच परिस्थिती आहे. परंतु पूर्व विभागात सार्वजनिक नवरात्र मंडळाची संख्या मोठ्या प्रमाणात असून हा भाग गरीब व कामगारांचा भाग आहे. येणारे ३ दिवस नवरात्र उत्सवाचे शेवटचे दिवस असून हे दिवस अंत्यत महत्वाचे आहे. या ३ दिवसात श्री देवीचे आरती, होम हवन, साड्या नेसविणे, महापुजा करणे असे पुजन मोठ्या प्रमाणात असतात म्हणून देवी भक्तांचे गर्दी मोठ्या प्रमाणात होते. यासाठी खालील समस्या सोडविणे ही नम्र विनंती.
समस्या :- १. सायं. ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत पोलिस गस्त वाढवावी. २. शहरातील ६ शक्तीपिठ देवस्थानाला पालखी मिरवणूकीस परवानगी द्यावी. ३. हिंगुलांबिका देवी मंदीर, गणेश पेठ येथे दि. २०/१०/२०२१ रोजी छबिना काढण्यास परवानगी द्यावी. ४. सदर ३ दिवस महिलेचे गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने दामिनी पथकाचे गस्त वाढवावे. ५. पुढील ३ दिवस रूपा भवानी दर्शनावर पोलिस बंदोबस्त वाढवावी. असे नमूद करण्यात आले.
विष्णु कारमपुरी (महाराज) व लक्ष्मीनारायण दासरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर, शहानवाज कंपली, प्रसाद जगताप, गुरूनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, गणेश म्हंता यांचा समावेश होता. यावेळी मा. पोलिस आयुक्तांनी सर्व अडचणी सोडविण्यात येईल असे सांगितले.