पूर्व भागातील पोषम्मा देवी ऊस्तवामध्ये महिला भगिनीसोबत सहभागी होऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी देवी मंदिरांचे बाहेरून दर्शन घेऊन पोषम्मा देवी चरणी प्रार्थना केली.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पूर्व भागातील पोषम्मा देवी ऊस्तवामध्ये महिला भगिनीसोबत सहभागी होऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी देवी मंदिरांचे बाहेरून दर्शन घेऊन पोषम्मा देवी चरणी प्रार्थना केली.

 

आषाढ महिन्यात पूर्व भागात श्री पोषम्मा देवी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज रोजी महिला भगिनींसोबत श्री पोषम्मा देवी उस्तवामध्ये व पूजाअर्चा मध्ये सहभागी होऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी पूर्व भागातील, अशोक चौक बोल्ली मंगल कार्यालय मागील, दत्त नगर, माधव नगर येथील पोषम्मा मंदिर, अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर, अशोक चौक म्हैसम्मा मंदिर, अश्या ठिकाणी देवी मंदिरांचे बाहेरून दर्शन घेऊन पोषम्मा देवी चरणी प्रार्थना केली आणि सर्व भाविकांना पोषम्मा देवी ऊस्तवाच्या तेलगु भाषेतून शुभेच्छा दिल्या, तसेच देवीच्या चरणी प्रार्थना केली की, रोगराई कमी व्हावे, कोरोना प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी व्हावे, उद्योगधंदे, रोजगार व्यवस्थित चालावे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत, सर्वांचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो

तसेच यावेळी वरील ठिकाणी भाविकांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सॅनिटाईजर व मास्क चे वाटप करण्यात आले.

यावेळी कॉंग्रेस शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, माजी सभापती गोवर्धन कमटम, कॉंग्रेसचे नेते शंकर चौगुले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, अंबादास गुत्तीकोंडा, अशोक कलशेट्टी, राजय्या मासन, व्यंकटेश विडप, नरहरी पडाल, व्यंकटेश सादुल, प्रभाकर सादुल, महांकाली येलदी, रमेश कुंचिकोरवे, आनंद कंदिकटला, गुरू बुरकुले, सिद्धार्थ गायकवाड, पुरुषोत्तम श्रीगादी, लता गुंडला, नरेश येलूर, श्रीनिवास परकीपंडला, चक्रपाणी गज्जम, हरीश कोंपेल्ली, बाळू क्षीरसागर, भिक्षापती परकीपंडला, लखन दांगडे, श्रीनिवास परकीपंडला, हेमनंतकुमार लिंबोळे, अमर शिंदे, रेणुका मंजुळकर, मनोहर माचर्ला, सतीश संगा, रेणुका निंबाळकर, ज्योती चौगुले, यशोदा चिंता, अशोक कमटम, राजू चौगुले, नागेश येमुल, भीमन्ना लिंबोळे, श्रीनिवास येमुल, रमेश वडनाल, श्याम येमुल, मधू वड्डेपल्ली, दामोदर आकेन, राकेश मंथेन, नरेश महेश्वरम, शिवानंद बळोरगी, लालू सानी, दिनेश गोसकी, गणेश कन्नम, रवी बोळकोटे, यांच्यासह महिला भगिनी इतर भाविक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here