मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील,काही समाजकंटकांनी, चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान केला असल्यामुळे याबाबत पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कृष्णाजी वसंत गायकवाड यांनी मोहोळ येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिले असून यामध्ये त्यांनी, या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की टाकळी सिकंदर येथील चौकामध्ये 1997 सालापासून शासकीय जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्वज व त्यासाठी कट्टा पूर्वी पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन, उभा करण्यात आला होता. यामध्ये गावातीलच काही विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या मंडळींनी, त्या कट्ट्याच्या आजूबाजूला अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला व सदर कट्टा झाकला जाईल अशा पद्धतीचे अतिक्रमण केले. सदर ज्या व्यक्तीने अतिक्रमण केले आहे त्या व्यक्तीच पोरी प्रशासनाच्या वतीने तोंडी समज देण्यात यावी अन्यथा आम्ही पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून पूरोगामी संघर्ष परिषदेच्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, या निवेदनामध्ये देण्यात आला आहे.
लवकरात लवकर त्या व्यक्तीस समज दिली न गेल्यास या संपूर्ण घटनेचे लोन सर्व महाराष्ट्रभर पसरून एखादी सामाजिक दंगल घडू नये म्हणून ही समज देण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड यांनी दिली आहे.
Home ताज्या-घडामोडी पूरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने, मोहोळ पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर! (त्या व्यक्ती...