पी.बी पाटील सर रूग्णालयात दाखल (आ. समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्यासह दिग्गज नेत्यांनी केली पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

संत दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक व मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भिवाजी पाटील उर्फ पी. बी. पाटील (सर) यांचा अपघात झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पी. बी. पाटील यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

सिद्धिविनायक हॅास्पिटलमधील डॅाक्टरांनी पुढील 48 तास पाटील यांच्या तब्येतीसाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं आहे. अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत.

 

पुण्यातून मंगळवेढ्याकडे परतत असताना उरळी कांचन जवळ मध्यरात्री दोन वाजता चहा पिण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात असताना सोलापूर वरून पुण्याकडे जात असणाऱ्या लक्झरीने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले.

अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली असून उरळीकांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे वृत्त मंगळवेढ्यात समजतात त्यांच्या नातेवाईकाकडे विचारणा केली जात आहे.

 

अनेक अफवांना ऊत आला असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राजकीय संघर्ष करत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. त्यांनी मतदारसंघ अध्यक्ष तसेच प्रांतिक सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात त्यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठा जनसंपर्क आहे. पाटील यांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे.

 

त्यांनी सांगितले ”की पाटील यांना 48 तास डॉक्टरच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कृपया कोणत्याही अफवा पसरू नका अथवा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजतात आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी फोन करुन पाटील यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली आहे. तर पंढरीनाथ माने, दिनकर यादव, रामेश्वर मासाळ हे सध्या रुग्णालयात आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here