पावसाचा अंदाज घेऊन 17 ऑक्टोबर दरम्यान होणार मोळी पूजन?-आ.प्रशांत परिचारक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(श्रद्धेय स्व. सुधाकर पंत परिचारक जयंती दिवशी 13 ऑक्टोबरला कामगारांना मिळणार गोड बातमी)

सोलापूर // प्रतिनिधी

श्रीपूर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 वर्षाचा 31 वा ऊस गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे चेअरमन जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते संकल्प यांत्रिकी अग्निकुंड होम प्रज्वलित करून बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. तसेच यावेळी सत्यनारायणाची महापूजा सपत्निक सौ.लक्ष्मीताई व आनंदराव रामदास आरकिले यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

कार्यक्रमाचे स्वागत वाईस चेअरमन वसंतनाना देशमुख यांनी केले, प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी केले, त्यावेळी त्यांनी 15 लाख टन ऊसाच्या नोंदी झालेल्या आहेत. पाचशे ऊसतोड टोळ्या तयार आहेत. दोनशे ट्रॅक्टर वाहने, बैलगाडी अशा पद्धतीने सर्व यंत्रणा चालू गळीत हंगामासाठी तयार ठेवण्यात आलेली आहे. कारखान्याच्या आतील सर्व मीलची कामे झालेली आहेत. कारखाना गाळपासाठी सज्ज आहे असे त्यांनी प्रास्ताविका मधुन सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी, “ येणाऱ्या दोनच दिवसात एफ आर पी ची राहिलेली रक्कम सर्व सभासद शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याचे सांगितले. 13 तारखेला मोठ्या मालकांची जयंती आहे. त्या दिवशी कामगारांना गोड बातमी,मिळणार आहे.

पहिल्या दिवसापासूनच रस इथेनॉल निर्मिती कडे वळणार आहे. तसेच डिसलरीचे देखील एक्सपान्शन चे काम सुरू आहे. पंधराशे टन ऊस इथेनॉल कडे नेण्याचे प्रयोजन आहे. तसेच एकूण हंगामाच्या 20% इथेनॉल कडे आणि 80 % साखर उत्पादनाकडे नेण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात आपल्या कारखान्याचे नाव लौकिक आहे, ती परंपरा मोठ्या मालकांच्या मार्गदर्शन क्रमाने आम्ही चालू ठेवणार आहोत. आमच्या समोर चालू सिझनला पंधरा लाख टन गाळप करण्याचे अहवान आहे. सर्व सभासदांनी आमच्याकडे ऊस दिला तर 180 दिवस किमान कारखाना चालवून त्याचा सर्व शेतकरी सभासदांना, कामगारांना फायदा होतो. त्यासाठी सर्वांनी ऊस आपल्या कारखान्याकडे गाळप करावा असे अहवान देखील केले. अतिशय चांगल्या पद्धतीने येणारा ऊस गळीत हंगाम आम्ही पार पाडू असे आपल्या भाषणामध्ये चेअरमन प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन दिनकरराव मोरे, मोठ्या मालकांचे सहकारी दाजी पाटील, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, बडोदा बँकेचे ए.जी. जनार्धन साहेब, दिनकरराव नाईकनवरे, प्रणव परिचारक, पंढरपूरच्या सभापती अर्चना व्हरगर, संतोष घोडके आप्पा जाधव, राजू गावडे, दिलीप चव्हाण, भगवान रेडे, सर्व संचालक, शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे यांनी केले तर आभार दिलीप चव्हाण यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here