उन्हाळ्याचे दिवस संभाव्य तीव्र पाणीटंचाई या संदर्भात आंधळगांव ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आ. समाधान आवताडे यांनी पाणीपुरवठा अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्याचबरोबर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पंचायत समिती, सर्व अधिकारी व ग्रामसेवक यांचेसमवेत सरपंच, पदाधिकारी यांची बैठक लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे पार पडली.
यावेळी संबंधित गावातील सरपंच व पदाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने मांडला. यावेळी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व आंधळगाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद असून त्या त्वरित सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार महोदय यांनी या योजना कार्यान्वित होण्यासाठी येणाऱ्या अडचणीची माहिती घेतली. यावेळी वीज बिल व पाणीपट्टी हीच अडचण असल्याचे सांगण्यात आली. यावेळी आ. समाधान आवताडे यांनी वीज वितरण जिल्हा प्रमुख सांगळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. व योजना सुरु करण्यासाठी सूचना केल्या.
यावेळी अनेक गावातील सरपंच यांनी पाणीपुरवठा दिरंगाईमुळे आमची गावे यातून वगळण्याची मागणी केली. सदर भावना लक्षात घेऊन त्वरित बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना आमदार महोदय यांनी केल्या. यावेळी सरपंच व पदाधिकारी यांनी गेली दोन वर्षे पाणी टंचाई अनुषंगाने बैठक लावली नव्हती. आ. समाधान आवताडे यांनी सदर बैठक घेऊन पाणी प्रश्नाबाबत चर्चा घडवून आणली. त्याबद्दल आभार व्यक्त केले. आमदार महोदय आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना त्वरित चालू करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या योजना त्वरित कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आंधळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार महोदयांनी दहा कोटीचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल संत दामाजी सहकारी साखर कारखाना संचालक सुरेश भाकरे यांनी आभार व्यक्त केले तसेच भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी असणारी शिखर समिती बरखास्त करण्याची मागणी गुलाबराव थोरबोले व मच्छिंद्र खताळयांनी केली
या बैठकीसाठी जि. प. कार्यकारी अभियंता दिपक कोळी, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण सुनिल देशपांडे, ग्रामीण पाणीपुरवठा उपभियंता राजकुमार पांडव, पंचायत समिती विस्तार अधिकारी साळुंखे, वीज वितरण अधिकारी वर्ग, जि. प. सदस्या मंजूळा कोळेकर, माजी सभापती प्रदीप खांडेकर, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, उपसभापती सुरेश ढोणे, संचालक सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, लक्ष्मण मस्के, धनंजय पाटील, बिरा लवटे, नाथा काशीद, दगडू सुतार, दत्ता साबणे, भारत गरंडे, गुलाब थोरबोले, मछिंद्र खताळ, शशिकांत चव्हाण, प्रा.येताळा भगत, दिगंबर यादव महादेव साखरे, गजानन भोसले, विठ्ठल मासाळ, पिंटू मोहीते, पप्पू वाडेकर आदी मान्यवर व सर्व गावचे सरपंच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.