माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक- पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२२-२३ साठीच्या सर्वोत्कृष्ट व जनरेशन प्रकल्प या पुरस्काराने सन्मानित करणार येणार असल्याची माहिती कारखान्याची चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली .तसेच कारखान्याच्या को- जन मॅनेजर तीन अधिकाऱ्यांनाही को जनरल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने याच कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे.
या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शनिवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याची कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली. हा पुरस्कार कामगार तसेच कारखान्याला मिळाल्यामुळे कामगार व दोन्ही तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.