पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच! संपुर्ण एफ आर पी ची रक्कम प्रति मे.टन रु.2626/- प्रमाणे शेतकऱ्यांना अदा 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(उशिरा गाळप झालेल्या ऊसास प्रति मे.टन रु.2726/- प्रमाणे अदा)

(माळशिरस पंढरपूर मंगळवेढा मोहोळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा!)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2021-22 मध्ये गाळप केलेल्या ऊसास एफ.आ.पी. पैकी देय असणारी ऊस दराची प्रति मे.टन रक्कम रु. 200/- शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. हा ऊस दर जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने जिल्ह्यात ऊस दरामध्ये पहिल्या क्रमांकावर राहणेची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच 1 एप्रिल 2022 नंतर ऊस तोड झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीची प्रति मे.टन रु.100/- प्रमाणे एकुण रु.2726/- अदा केले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी दिली यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री. कैलास खुळे कारखान्याचे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2021-22 मध्ये 12,51,344 मे.टन ऊसाचे गाळप करुन 14,25,280 क्विं. साखर उत्पादित केली आहे. त्याचबरोबर साखर उताराही 11.65% इतका राहिला आहे. को-जनरेशन मधुन 8 कोटी 53 लाख युनिट विज निर्माण करुन 4 कोटी 05 लाख युनिट विज निर्यात केली आहे. कारखान्याच्या आसवानी प्रकल्पापासून 1.28 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.
कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) हे श्रध्देय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या शेतकरी हिताय, कामगार सुखाय या उक्तीप्रमाणेच प्रथम शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांनी एफ आर पी प्रमाणे निघणारी ऊस दराची रक्कम शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी तसेच दसरा, दिवाळी सणासाठी अदा करुन आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. हंगाम 2021-22 मध्ये गाळप केलेल्या ऊसाची एफ आर पी प्रति मे.टन रक्कम रु. 2626/- असुन त्यापैकी पूर्वीच रक्कम रुपये 2426 शेतकऱ्यांना अदा केलेली आहे उर्वरीत प्रति मे.टन रक्कम रुपये 200/- प्रमाणे ऊस बिलाची देय रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे तसेच गाळप हंगाम 2021-22 मध्ये 1 एप्रिल 2022 नंतर ऊस तोड केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मे.टन रु. 100/- प्रमाणे ज्यादाची रक्कम दिल्याने त्यांना कारखान्याकडून प्रति मे.टन 2726/- प्रमाणे ऊस दर दिला आहे. कारखान्याकडुन दिला जाणारा जिल्ह्यातील सर्वोच्च ऊस दर व देण्यात येणारी संपूर्ण ऊस बिले याचाच परिपाक म्हणून कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांना नुकताच डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकराव मोरे, श्री. वसंतराव देशमुख, श्री.हरीष दादा गायकवाड, श्री. उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.हरीष गायकवाड, श्री. ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री. बाळासो यलमर, श्री.भगवानराव चौगुले, श्री. भैरु वाघमारे, श्री.लक्ष्मण धनवडे, श्री.भास्कर कसगावडे, श्री.गंगा मामा विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, श्री.किसन सरवदे, शामराव साळुंखे, श्री.राणू पाटील इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here