पांडुरंग कारखाना सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धन व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्काराने सन्मानित! कारखान्याचे केन मॅनेजर संतोष कुमठेकर यांनाही उत्कृष्ट शेती अधिकारी पुरस्कार प्रदान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी  बु.॥ पुणे यांनी हंगाम 2021-22 मधील कामगिरीसाठी  आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील या नावाने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार  त्याच बरोबर कारखान्याचे केन मॅनेजर श्री संतोष कुमठेकर यांना उत्कृष्ट शेती अधिकारी पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील , हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच या  समारंभात नॅशनल फेडरेशन दिल्ली यांच्याकडून देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमतेचा  पुरस्कारही मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार पांडुरंग चे चेअरमन प्रशांत परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, दिनकर मोरे व संचालक अधिकारी यांनी स्वीकारला.

 प्रशांतराव परिचारक यांनी प्रतिक्रिया देताना सांगीतले की,   ऊस विकास विभागाचे कार्य उल्लेखनिय असलेमुळेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु.॥ पुणे यांचा आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री पांडुरंग कारखाना हा नवनविन यशाची शिखरे पार करीत असताना कारखाना राबवित असलेल्या शेतकरी हिताच्या योजना व त्याची ऊस उत्पादक शेतकरी करीत असलेले काटेकोरपणे अंमलबजावणी यामुळेच कारखान्याची प्रगती होत आहे. कारखान्याने नेहमीच सुधारीत ऊस वाणांची निवड करुन लागवड करुन ऊस उत्पादकास व कारखान्यास जास्तीत जास्त साखर उत्पादन मिळवून आर्थिक फायदा केला आहे. त्यामुळेच कारखाना जिल्ह्यात सर्वाधीक ऊस दर देत आहे. कारखाना श्रध्देय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांनी घालुन दिलेला आदर्श पुढे चालवित असून शेतकरी, कामगार यांचे हित जोपासत आहे. कारखाना शेतकऱ्यांची नियमीतपणे ऊस बिले, कामगारांचे पगार, व्यापाऱ्यांची देणी वेळेवर देत आहे.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कारखान्यास मिळालेल्या ऊस विकास व संवर्धन पुरस्कारामध्ये कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी शेतकऱ्यांच्या माती पाणी परिक्षणानुसार खताची मात्रा, सुपंत द्रवरुप खत निर्माती, शुध्द व जातीवंत ऊस बियाणे, ऊस रोपे लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करुन शेतकऱ्यांना दिनदर्शिकेद्वारे मार्गदर्शन करुन त्याचे वाटप सर्व ऊस उत्पादकांना केल्यामुळेच ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊस शेतीत बदल करुन जास्तीत जास्त उत्पादन काढता आले. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती करणेसाठी पाचट व्यवस्थापण केले आहे.  या सर्व  बाबींचा विचार करून कारखान्यास पुरस्कार मिळाला आहे.

कारखान्याचे चेअरमन  प्रशांतराव परिचारक मालक यांनी कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु.॥ पुणे याचां ऊस विकास व संवर्धन पुरस्कार मिळालेबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व संतोष कुमठेकर आणि कारखान्याचे सर्व अधिकारी तसेच ऊस विकास अधिकारी  श्री सोमनाथ भालेकर व त्यांचा सर्व स्टाप यांचे अभिनंदन करुन पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here