राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेशदादा पाटील यांचे माजी आमदार राजन पाटील यांना खुले आव्हान! पवार साहेबांचा फोटो काढलात,बस…आता मी कोणाचंही ऐकून घेणार नाही!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेशदादा पाटील यांचे माजी आमदार राजन पाटील यांना खुले आव्हान!

पवार साहेबांचा फोटो काढलात,बस…आता मी कोणाचंही ऐकून घेणार नाही!

बारा आणि 17 वाड्याच्या मतांची बेरीज सांगणा-या मंडळींनी हिंमत असेल, तर अनगरमध्ये मतदान केंद्राच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा लावावा. गावातीलसुध्दा मत तुम्हाला पडणार नाही. पोस्टरवरून शरद पवार आणि अजित पवारांचा फोटो काढून टाकत असाल, तर मला कोणीही सांगू द्या, मी ऐकणार नाही. तुमच्यात हिंमत असेल, तर अपक्ष या किंवा कोणत्याही पक्षातून निवडणूकीला माझ्या समोर या, असे खुले आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी अनगरकरांना दिले आहे. मोहोळ येथील चाटी गल्ली परिसरातील मैत्रीचा पूल व इतर विविध विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, राहुल क्षीरसागर, समाधान पाटील, तनवीर शेख, अण्णासाहेब पाटील, फुलचंद सरवदे, अण्णासाहेब गोटे, राजाभाऊ रसाळ, शांतीकुमार अष्टूळ, अतुल क्षीरसागर, अजय कुरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उमेश पाटील म्हणाले की, राज्यात सत्ता बदल होताच यांना पक्ष बदलण्याच कस सुचलं? असा सवाल करीत पोस्टरवरून राष्ट्रवादीच्या चिन्हासह पवार परिवाराचे, जयंत पाटील यांचे फोटो काढून यांनी शरद पवारांचा त्याग केला, हे सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष बदलाचा निर्णय निश्चित झालाय परंतु भाजपवाल्यांनीही यांचा प्रवेश रोखला आहे रमेश बारसकर यांनी स्वतःची एक कोटीची जागा देण्याचे कबूल केले असतानाही केवळ व्देषापोटी हे क्रिडा संकुल रखडविले असून हिंमत असेल तर मार्केट कमिटीच्या मालकीची शहरालगतची पाच एकर जागा क्रीडा संकुलासाठी द्यावी असे आवाहन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here