परिचारक आणि कंपनी हेच आपले मूळ विरोधक आहेत:-कल्याणराव काळे
(कासेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न)
सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपुर तालूक्यातील कासेगाव येथे ब-याच दिवसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आढावा बैठक पार पाडली यावेळी झालेल्या चुका दुरूस्त करीत झाले गेले सगळे विसरून सर्वांनी एकजुटीने एकत्रीत येत ये-या निवडणूकीला सामोरे जाऊ असे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आले. विधानसभा पोटनिवडणुकीत ज्यांनी पक्ष विरोधी काम केले आणि पक्षाच्या उमेदवारास पाडले, जे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी करून पक्षाचेच नुकसान करीत आहेत. अशा लोकांना पक्षातून काढून टाका अशी एकमुखी मागणी करणारा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कासेगाव येथील कार्यकर्ता बैठकीत करण्यात आला. या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आमच्यावर सगळ्यांची बारीक नजर असून “आम्ही कुठे जातो काय करतो कुठे जेवतो कुठे झोपतो”अशाप्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे आमच्या भोवताली खुपसून आमच्या पत्नीची सुद्धा आम्हाला एवढी भीती वाटत नाही तेवढी आता या विरोधकांची वाटू लागले आहे त्याच बरोबर परिचारक आणि कंपनीने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात उसाचा दर दिला का कारखान्याचा काय केलं काय नाही त्याच्याबद्दल कोणी एक मात्रा शब्द बोलण्यास तयार नसून मी व भगिरथ दादा भालके, कुठे जातो कुणाला भेटतो याची त्रस्त माणसामार्फत चौकशी सुरू आहे. अशी घणाघाती टीका सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आ. प्रशांत परिचारक यांचे नाव न घेता कल्याणराव काळे यांनी जाहीर सभेत केली. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष आंकडे अनेक गा-यांनी व तक्रारी मांडल्या.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जेष्ठ नेते कल्याणराव काळे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, व्यापार उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, माजी जि प सदस्य चंद्रकांत बागल, माजी नगराध्यक्ष सुभाष पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संदिप मांडवे,युवा नेते शेखर भालके आदी उपस्थित होते.
सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी यावेळी येत्या काही दिवसात विठ्ठल सहकारी आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक प्रश्न सुटतील आणि सर्व काही सुरळीत चालू होईल, आम्ही त्यासाठीच प्रयत्न करीत आहोत, अशी ग्वाही दिली. तसेच विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले.
तर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी विधानसभा पोटनिवडणूकित कोणी कोणी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठवला असून ज्यांनी पक्ष्याच्या विरोधात काम केले त्यांच्यावर कारवाई होईल, मात्र पुढच्या काळात सर्व निवडणुकांत एकजुटीने काम करावे असेही आवाहन केले.