पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा बैठकीत पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा तसेच ठाणे व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा बैठकीत पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा तसेच ठाणे व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती संपन्न.

 

पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र (रजि.) संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण येथील शासकीय विश्रामगृह येथे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तथा “श्री साम्राज्य” वर्तमानपत्राचे वृत्त संपादक जाफर वणू ह्यांच्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ याने केलेल्या मारहाण प्रकरणी अर्जाचा विचार विनिमय, ठाणे जिल्हा कमिटीची बांधणी, तालुकास्तरीय बांधणी तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार त्यानंतर प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, प्रदेश संघटक राजेश मापरा, माजी कोकण विभाग अध्यक्ष गौसखान पठाण, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत *प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, राज्यातील सर्वच माध्यमातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण, खोटे गुन्हे दाखल, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, राज्यातील युट्युब वेब पोर्टल ला शासकीय मान्यता व जाहिराती मिळणे, पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी, कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला शासकीय मदत व शासकीय सेवेत सामावून घेणे इत्यादी विषयावर चर्चा करून राज्यातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नावर तसेच पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तथा “श्री साम्राज्य” वर्तमानपत्राचे वृत्त संपादक जाफर वणू ह्यांच्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ याने विनाकारण केलेल्या मारहाण प्रकरणी* अश्या अनेक पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार ह्यांनी व्यक्त केला.

तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे, सरचिटणीस मनोज जैन, उपाध्यक्ष जाफर वणू, गौतम वाघ ह्यांनी ठाणे जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील कार्यकारिणी बळकट करण्यासाठी विचार पूर्वक निर्णय घेत नूतन ठाणे जिल्हा कार्यकारिणी व तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. सदर निवडीत ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजय साळवे , खजिनदार प्रवीण राणे, कार्याध्यक्ष मुन्ना खंडेलवाल कायदेशीर सल्लागार ऍड. बाबू खंडेलवाल, महासचिव / समन्वयक विजय सिंग, समन्वयक जगदीश देवानी, भरत सणस, सत्येन्द्र पांडे, व्यवस्थापक प्रमोद हरपुडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ तालुका अध्यक्ष अशोक नाईक यांना पदोन्नती करून तालुका प्रभारी पद देऊन त्यांच्या अधिपत्याखाली अंबरनाथ तालुका अध्यक्ष अजय चिरीवेल्ला, सरचिटणीस बबलू चक्रवर्ती, कार्याध्यक्ष वामन उगले आणि खजिनदार संतोष तिवारी या सर्वांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या बैठकी दरम्यान प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, राजेश मापरा, गौसखान पठाण, रामचंद्र सरवदे, अरुण ठोंबरे, मनोज जैन, जाफर वणू, गौतम वाघ, संजय साळवे, रशीद शेख, तानाजी लोणे, काळुराम भोईर, बाळू बोन्द्रे, सुनील फर्डे, अशोक शिरसाट, सलीम मन्सुरी, सुरेश जगताप, अशोक नाईक, अजय चिरीवेल्ला, वामन उगळे, बबलू चक्रबॉती, व्यंकटेश राव, राजेश फक्के, विजय सिंग, प्रमोद हरपुडे, दिनानाथ कदम, हरी चंदर आल्हाट, ब्रिजेश श्रीवास्तव, भरत सणस, जगदीश देवानी, जगनसिंग राजपूत ह्यांचासह आदी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here