पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

सोलापूर // प्रतिनिधी 

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व प्रसिद्धी माध्यमापासून दूर असलेल्या विविध व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती वतीने सन्मान चिन्ह सन्मान पत्र तसेच सत्कार करून पुरस्कार दिला जातो
पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापुरात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संजय डोळे यांच्या हस्ते सन्मान पत्र सन्मान चिन्ह व शाल फेटा व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
आदर्श पत्रकार
*वैजिनाथ बिराजदार*
*युवराज सरवदे*
*विजयकुमार उघडे*
आदर्श ग्रामसेवक
*संजय घोगरे*
आदर्श कामगार नेते
*विष्णू कारमपुरी*( महाराज )
यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांचा शाल पुष्पगुछ देऊन व फेटा बांधून सत्कार केला
याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे यांनी कोरोना सारख्या भयानक रोगातून बाहेर पडत असताना समाजातील विविध स्तरावर सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती पुरस्कार देऊन एक नवी ऊर्जा व पाठबळ देण्याचं काम करत असल्याचे नमूद करून पत्रकारांच्या विविध प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवत असल्याचे सांगितले
*पत्रकार सुरक्षा समितीचे कार्य नेहमीच प्रेरणा देणारे*
यावेळी कामगार नेते जेष्ठ पत्रकार विष्णू कारमपुरी यांनी पत्रकार सुरक्षा समिती च्या काम अतिशय सुंदर असून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार ला जाग आणून पत्रकारांचे प्रश्न सोडवत असून पत्रकार धमकी मारहाण हल्ले बाबत पत्रकार सुरक्षा समिती लढा देत असल्याचे नमूद करून पत्रकार सुरक्षा समिती चे काम प्रेरणादायी असल्याचे आवर्जून सांगत पत्रकार सुरक्षा समिती च्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे मोहोळ तालुका अध्यक्ष अमर पवार तालुका सचिव ज्ञानेश्वर गवळी शुक्राचार्य शेंडेकर प्रवीण फराटे सोलापूर शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी ( बी एस ) संघटक धर्मणा गोरे उपाध्यक्ष बिपीन दिड्डी सचिव अभिषेक चिलका प्रसिद्धी भास्कर वोधूल संपर्क प्रमुख लक्ष्मण गणपा अक्षय बबलाद इस्माईल शेख प्रसाद ठक्का, युनूस अत्तार शब्बीर शेख डॉ रवींद्र सोरटे सिद्धार्थ भडकुंबे, जेष्ठ पत्रकार बाबा काशीद , श्रीनिवास वंगा, राजाभाऊ पवार सह दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, रमेश चिलवेरी, पपू शेख, संतोष जाधव, प्रसाद जगताप, रेखा आडकी, अनिता बटगेरी, संध्याराणी कुऱ्हाडकर उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here