पत्रकार जाफर वणू मारहाण बाबत पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकार जाफर वणू मारहाण बाबत पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

 

सोलापूर // प्रतिनिधी 

पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, साम्राज्य वृतपत्र चे वृत्त संपादक जाफर वणू यांना दिनांक 30/6/2021 रोजी विनाकारण अंबरनाथ पश्चिम चे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी कान पिरघाळून दमदाटी करून मारहाण करून पत्रकार जाफर वणू यांना अपमानित केले असल्याने या घटनेचा निषेध नोंदवून पत्रकार सुरक्षा समिती वतीने पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे
*पत्रकार जाफर वणू मारहाण बाबत पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक*
राज्यात पत्रकारांना मारहाण धमकी खोटे गुन्हे दाखल असे प्रकार वाढले असून खरी व प्रामाणिक पत्रकारिता धोक्यात आल्याने पत्रकारिता करायची कशी? असा जळजळीत प्रश्न प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्य सरकार ला विचारला असून पत्रकार जाफर वणू मारहाण बाबत मुख्यमंत्री महोदयांनी जातीने लक्ष घालून पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन कारण्याचा इशारा मुख्यमंत्री यांना देण्यात आला असून सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे
यावेळी राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) सचिव अभिषेक चिलका अक्षय बबलाद इस्माईल शेख रोहित घोडके इम्तियाज अक्कलकोटकर मोहंमद इंडिकर योगेश स्वामी सतीश गडकरी दत्तात्रय धनके, हरी भिसे इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here