पत्रकार अनिल हुल्ले मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या दणक्याने गुन्हे दाखल.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापुर | प्रतिनिधी
काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनचा पकडून विचारपूस करणाऱ्या सोलापुरातील आवाज महाराष्ट्राचा या न्युज चॅनल मधील पत्रकाराला सात रस्ता परिसरात २४ ऑक्टोंबर रोजी मारहाण झाले असून

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल चे पत्रकार अनिल हुल्ले यांना एका बातमी दाराकडून बातमी मिळाली होती की एक पिकअप छोटा हत्ती गाडी क्रमांक mh२५..P ४९९९ मधून रेशनचा गहू आणि तांदूळ, डाळ, विनापरवानगी बेकायदेशीर विक्रीसाठी सात रस्ता परिसरातून जाणार आहे. पत्रकार अनिल हुल्ले हे सात रस्ता परिसरात गाडीची वाट पाहत उभारले होते… एवढ्यात वरील क्रमांकाची गाडी सात रस्ता परिसरातून जात असताना अनिल हल्ले यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा इशारा दिला… गाडीमध्ये ड्रायव्हर एक

क्लिनर व मागे एक मुलगा असे तीन व्यक्ती होत्या… या छोटा हत्ती गाडीत अंदाजे पाच टन धान्य होते.. सदरच्या रेशनच्या धान्याचा संदर्भात ड्रायव्हरला विचारणा केली असता व कागदपत्रे विचारले असता ड्रायव्हरने पत्रकार अनिल हुले यांना कागदपत्रे दाखले, मात्र ती कागदपत्रे सहा महिन्या अगोदर ची होती.. अनिल हुल्ले यांनी सदर चा मुद्देमाल व गाडी सदर बाजार पोलिस स्टेशन येथे नेण्यास सांगितले.

त्यावेळी ड्रायव्हरने दोन ते तीन व्यक्तींना बोलावून घेतले. व ती व्यक्ती येऊन तू कुठला पत्रकार आहे? कुठे राहतो? तू आमची शूटिंग का घेतो असे म्हणून धक्काबुकी व बेदम मारहाण करून मोबाईल फोडण्याचा प्रयत्न केला.. मोबाईल खाली पाडले… या वेळी ताबडतोब पत्रकार अनिल हुल्ले यांनी पोलिसांशी संपर्क साधला… मात्र पोलिसांशी संपर्क झाला नाही. शेवटी पत्रकार अनिल हुल्ले यांनी पोलीस आयुक्तालय गाठले.. मात्र तेथे ही त्यांना मदत मिळाली नाही.

अशातच रेशन चा धान्य घेऊन जाणारा गाडीवाला सातरस्ता परिसरातून पसार झाला. या सर्व प्रकरणाची हकीकत सांगण्यासाठी सदर बाजार पोलिस स्टेशन गाठले असता तेथे लवकर फिर्याद घेतली नाही , अखेर पत्रकार अनिल हुल्ले यांनी पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांना फोनवरून माहिती दिली.

पत्रकार सुरक्षा समितीचा दणका सदर बाझार पोलिस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी पत्रकार अनिल हुल्ले गेले असता पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच पत्रकार अनिल हुल्ले यांनी थेट पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांना फोनवरून माहिती दिली अवघ्या १५ मिनिटात पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार व धसका न्यूज नेटवर्क चे संपादक अक्षय बबलाद यांच्या समवेत पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कलम ३२३ , ५०४ , व ३४ प्रमाणे संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here