पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नवजात बाळांना सोन्याची सोनेरी अंगठी भेट! (भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचा कोल्हापुरात अनोखा उपक्रम)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस यानिमित्त संपूर्ण देशभर भाजपच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री १२ पासून आज रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठ्या प्रदान करण्यात आल्या. सीपीआरच्या प्रसूती विभागात सर्वसामान्य महिलांची प्रसूती होते. त्यांनाही पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मिळावा, या उद्देशानं भाजपच्यावतीनं, अंगठी वाटप केल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस! यानिमित्त भाजपच्यावतीनं देशभरात सेवा पंधरवडा साजरा केला जातोय. याअंतर्गत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, दिव्यांगांना साहित्य वाटप तसंच सर्वसामान्यांनाही वस्तू वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कोल्हापुरात भाजपच्यावतीनं आज दिवसभरात विविध सामाजीक उपक्रम राबवण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या दातृत्त्वाचा वारसा पुढं चालवण्याच्या हेतुनं भाजपच्यावतीनं सीपीआरमध्ये अभिनव उपक्रम राबवण्यात आला. जिल्हयातील कष्टकरी, मध्यमवर्गीय शेतमजूर, वीटभट्टीवर काम करणार्‍या महिलांची प्रसूती छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात होते. या महिलांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मिळावा, म्हणून शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून आज रात्री १२ वाजेपर्यंत सीपीआरच्या प्रसूतीविभागात जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठीचं वाटप करण्यात आलं. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभरात जन्मलेल्या बालकांना सोन्याची अंगठी आणि मातांना ब्लँकेटस्चं वाटप करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं.

 

खासदार धनंजय महाडिक भाजपच्यावतीनं सीपीआरमध्ये अनोखा उपक्रम राबवल्यानं आज जन्मलेल्या बालकांचे कुटुंबीय भारावून गेले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, डॉ. महेंद्र बनसोडे, प्रदीप उलपे, संगीता खाडे, संग्राम निकम, विजय खाडे, उदय शेटके, संजय निकम, चंद्रकांत संकपाळ, रहिम सनदी,राहुल घाटगे, विशाल शिराळकर, बंटी सावंत यांच्यासह भाजप आणि युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here