पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत श्री विठ्ठलाची आरती!
भारताचे कणखर आणि यशस्वी प्रधान सेवक श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते प्रणव दादा परिचारक यांच्या हस्ते श्री.विठोबाची सामुदायिक आरती करण्यात आली.
सेवा, त्याग आणि निष्ठा याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे मोदीजी. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मोदींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आला असून, पूर्ण ताकदीने आम्ही कार्यकर्ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या क्षेत्रात आ. प्रशांत मालकांच्या नेतृत्वात सेवा उपक्रमाने मोदीजींना पाठिंबा देऊ, अश्या भावना यावेळी प्रणव दादा परिचारक यांनी व्यक्त केल्या.
सर्वोच्च प्राधान्य नेहमी देशहिताला देणाऱ्या मोदींजींचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक आदर्श. त्यांच्या आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी युवक नेते प्रणव दादा परिचारक यांनी मनस्वी शुभचिंतन व प्रार्थना व्यक्त केली.