पंढरीत हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सचे खा.रणजित निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरीत हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सचे खा.रणजित निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन..!

 

पंढरपुरात कॉम्प्युटर हार्डवेअर क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या , हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सची शाखा कार्यरत होत आहे. शुक्रवारी या कॉम्प्युटर फर्मचे उद्घाटन खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होत असून, याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे , आ. शहाजी पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती फर्मचे प्रमुख पंढरीनाथ बागल यांनी दिली आहे.

अध्यात्मिक वारसा सांगणाऱ्या पंढरी नगरीत , हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सचे नवीन दालन खुले होत असून येथील सरगम चौकातील एचडीएफसी बँके शेजारी, हे भव्य शोरूम थाटण्यात आले असून शुक्रवार दि.१६ जुलै रोजी, दुपारी ३.४५ वाजता या कॉम्प्युटर फर्मचा उद्घाटन सोहळा माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पर पडणार आहे.

या उदघाटन सोहळ्यास माजी आ.दीपक साळुंखे-पाटील, दत्तात्रय सावंत , नगराध्यक्षा साधना भोसले , विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके , धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, पांडुरंगचे व्हॉ.चेअरमन वसंत देशमुख , मनसेचे सहकार शाडो मंत्री दिलीप धोत्रे , शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, कुर्मदास कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे , गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, प्रांताधिकारी सचिन ढोले, धनश्री परिवाराचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे , स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी.पी. रोंगे , विठ्ठलचे संचालक महादेव देठे, युवराज पाटील, जि.प.सदस्य शैलाताई गोडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.

पंढरीत नव्याने सुरू होत असलेले हाऊस ऑफ कॉम्प्युटर्स हे, एचपी लॅपटॉप आणि प्रिंटर्सचे शोरूम असून पुणे येथे प्रधान कार्यालय असणाऱ्या या नामवंत कंपनीचे पंढरीत हे चौथे शोरूम उभारण्यात येत आहे. प्रशस्त दुरुस्ती केंद्र , मोठा प्रशिक्षित स्टाफ तसेच या ठिकाणी होणारी कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची विक्री आणि दुरुस्ती येथील ग्राहकांना फायद्याची ठरणार आहे. याठिकाणी देण्यात आलेला प्रशिक्षित स्टाफ कंपनीकडून नियुक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या संख्येतील स्टाफमुळे , वेळेचा अपव्यय टाळून, ग्राहकांना नक्कीच समाधान मिळणार असल्याची खात्री पंढरीनाथ बागल यांच्याकडून देण्यात येत आहे.

चौकटीत:-

पंढरपूर शहरात नव्याने सुरू होत असलेल्या , कॉम्प्युटर क्षेत्रातील अग्रगण्य फर्म , हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सच्या शाखेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडत आहे. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून, हे फर्म येथील नागरिकांना समाधानकारक सेवा पुरवणार असल्याचा आशावाद, पंढरीनाथ बागल यांनी व्यक्त केला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here