पंढरीत आमदारांच्या वाढदिवसानिमित्त ३११ रक्तदात्यांचे रक्तदान आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरीत आमदारांच्या वाढदिवसानिमित्त ३११ रक्तदात्यांचे रक्तदान

आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद!

पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि पाणीदार आमदार समाधान दादा अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे ३११ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने येऊन रक्तदान केले.

 

पंढरपूर येथील आवताडे समर्थक यांच्या वतीने फरताळे दिंडी क्रमांक ९ येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

 

रक्तदान हे श्रेष्ठदान असे मानले जाते. आपल्या रक्तदान केल्याने अनेकांचे जीवन तसेच गरजवंताला त्याचा लाभ होणार आहे. आपल्या रक्तदानामुळे अनेक रुग्ण बरे होणार आहेत. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्यक्रम घेऊन आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला आहे.

 

दरम्यान सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी विविध शिबिरे घेण्यात आली होती. त्यापैकी नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,चश्मे वाटप, जयपूर फूट, आरोग्य तपासणी, योगाभ्यास व योगामुळे शरीराला होणारे फायदे याबाबत मौलिक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. दैनंदिन जीवनात आरोग्याचे महत्त्व ओळखून मतदार,नागरिकांच्या हितासाठी आरोग्याच्या विविध तपासण्या करणारे शिबीर आयोजित केल्याने सर्वसामान्य नागरिकांना जनतेला याचा मोठा लाभ मिळाला. त्याच बरोबर पशुधन वाचविण्यासाठी तपासणी व पोष्टीक खाद्द, औषधोपचार शिबीर घेण्यात आले.

 

यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक सुनीलराज डोंबे, राष्ट्रवादीचे सुधीर भोसले,माजी सभापती विजयसिंह देशमुख, प्रसाद भैय्या कळसे, भारत रणदिवे माजी सरपंच तावशी, अनिल यादव संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष, बालमभाई मुलाणी, रिपाइंचे संतोष पवार, नगरसेवक निलेश आंबरे, दिपक येळे, बशीर तांबोळी,आदम बागवान, जमीर तांबोळी,पिराजी आण्णा धोत्रे, आबासाहेब पाटील किशोर जाधव, राहुल साबळे शांतिनाथ बागल कीर्तीपाल सर्वगोड, कृष्णा वाघमारे, कृष्णा कवडे, अमोल धोत्रे, शेखर भोसले, शहाजी शिंदे, द्रोणाचार्य हाके, संतोष मोरे, दादा घायाळ, बापूसो गोडसे, संजय माळी, मोहन आप्पा बागल, प्रथमेश बागल, अण्णा फटे, राहुल माने, बापूसो कदम, समाधान देठे, संभाजी पाटील, तुकाराम कुरे, सज्जन जाधव, हनुमंत ताटे, अनिकेत देशमुख, अमोल नागटिळक, शिवाजी कांबळे, कल्याण कुसुमडे, जगन्नाथ जाधव, सुधाकर गायकवाड, महेश चव्हाण, ओंकार भोसले, बिभीषण बोरगावे, किसन पवार, बिरुदेव मासाळ विठ्ठल लवटे दिगंबर मोठे अनिल कोळी, दत्ता आबा रोंगे,खताळ मेंबर, प्राजक्ता देणारे,अपर्णा तारखे, जयश्री क्षीरसागर, बदल ठाकूर,ज्योती जोशी,दत्ता शिंदे आकाश आटकळे, अमोल पवार, नगरसेवक संजय निंबाळकर, नगरसेवक बसवेश्वर देवमारे, बाळासाहेब जाधव, दत्ता यादव, तौफिक शेख,

आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here