पंढरीतील बुद्धभूमी विकासासाठी प्रशासनाने कामाचा वेग वाढवावा अन्यथा जन आंदोलन : कॉ. डॉ. भारत पाटणकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पौष पौर्णिमा निमीत्त पंढरपुरातील बुद्धभूमिवरील बोधिवृक्षाचे पूजन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. भारत पाटणकर आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे प्रमुख साहित्यिक कॉ. धनाजी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉ. डॉ. भारत पाटणकर यांनी पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभुमीच्या निधी मंजुरीसाठी विविध शासकीय स्तरांवर सुरू असलेल्या प्रस्तावाचा आढावा घेतला. २०१२ पासून प्रस्तावित असलेल्या आणि पंढरीच्या विकासामध्ये विशेष महत्त्व असलेल्या या बुद्धभूमीच्या प्रस्तावासबंधी शासनाने आणि प्रशासनाने आपल्या कामाचा वेग वाढवावा अन्यथा व्यापक जन आंदोलन उभारू असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी विद्रोही साहित्य संमेलनाचे प्रमुख साहित्यिक कॉ.  धनाजी गुरव यांनी पंढरपूर नगरपरिषदेने बुद्धभुमिसाठी या सुंदर दहा एकर परिसराची निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत या  पर्यावरणपूरक बुद्धभूमीच्या विकासासाठी डॉ. पाटणकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण योगदान देण्याचे जाहीर केले.
यावेळी सम्यक क्रांती मंच चे संस्थापक; सिद्धार्थ जाधव, अध्यक्ष; प्रशांत लोंढे, सचिव; स्वप्नील गायकवाड, सदस्य; प्रवीण माने, राजन गायकवाड तसेच बसपाचे सोलापूर जिल्हा प्रभारी; भालचंद्र कांबळे, महासचिव; रवि सर्वगोड,  पर्यावरणप्रेमी मोहन अनपट सर, शिवाजी देवकते, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here