पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न संपला!
(उद्योगपती अभिजित पाटील यांनी सांगोला सहकारी साखर कारखाना घेतला चालवायला)
सोलापूर // प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाभयंकर अशा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात पहिल्यांदा अक्सिजन प्रकल्प उभा करुन संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवणारे व ऑक्सिजन मॅन अशी उपाधी लाभलेल्या पंढरपूर तालुक्यातील अभिजीत धनंजय पाटील यांनी सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील सांगोला सहकारी साखर कारखाना अखेर भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून यास चेअरमन अभिजित पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
2012 सालापासून बंद असलेला हा सहकारी तत्त्वावर साखर कारखाना विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या ताब्यात होता पण काही आर्थिक व इतर कारणास्तव हा कारखाना बंद करण्यात आला होता त्यानंतर हा कारखाना चालवण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते त्या अनुषंगाने पंढरपूरचे स्थानिक उद्योगपती व संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे नाशिक नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात साखर कारखानदारी यशस्वीपणे चालवून दाखवणारे अभिजित धनंजय पाटील यांनी हा कारखाना चालवण्यासाठी रस दाखवल्यानंतर हा कारखाना लॉंग लींग भाडेतत्वावर देण्यात आले असल्याचे समजत आहे यासाठी गेल्या महिन्याच्या पाच तारखेपासून राज्य शिखर बँकेकडून यासाठी जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. या सांगोला सहकारी साखर कारखाना साठी सुमारे १० हजार सभासद पात्र आहेत. यासाठी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील राज्य शिखर बँकेचे चेअरमन अनास्कर साहेब कारखान्याचे कार्यकारी संचालक देशमुख साहेब, यांच्याबरोबर काही दिवसापूर्वी मुंबईत एक संयुक्त बैठक होऊन हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी मंजुरी मिळाल्याचे यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
चौकट :-
आम्ही सर्व कायदेशीर बाबी तपासून व राज्य शिखर बँकेच्या नियम व अटी नुसार हा कारखाना चालविण्यास घेतला असून येत्या गळीत हंगामात पासून हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून पंढरपूर, मंगळवेढा, व सांगोला तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपाचा आम्ही प्रयत्न करू.
अभिजीत पाटील
उद्योगपती DVP उद्योग समूह