पंढरपूर येथे समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ मोठ्या उत्साहात संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर येथे समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ मोठ्या उत्साहात संपन्न

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स, पंढरपूर येथे आज भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. प्रत्येकी दहा ग्राहकांमध्ये हा लकी ड्रॉ घेण्यात आला असून या लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस म्हणून मोटर सायकल तर दुसरे बक्षीस म्हणून एलईडी टीव्ही तर तिसरे आटाचक्की व इतर सात ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देण्यात आले असल्याचे जाहीर केले होते..

शनिवार दिनांक १६सप्टेंबर २०२३ रोजी पंढरपूर येथील समृद्धी ट्रॅक्टर, शोरूम येथे हा लकी ड्रॉ घेण्यात आला असून या लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षिसाचे मानकरी म्हणून ता.पंढरपूर भोसे येथील श्री.मनोज नवनाथ माळी यांना प्रथम बक्षीस मोटर सायकल तर दुसरे लईडी टिव्ही बक्षीस श्री.संदीप नामदेव तरंगे रा-तरंगफळ आणि तिसरे बक्षीस आटा चक्की श्री. महादेव बबन जाधव रा-केसकरवाडी येथे देण्यात समृद्धी ट्रॅक्टरचे श्री.अभिजीत कदम तसेच श्री.रायाप्पा हळणवर यांच्या हस्ते आले.

यावेळी सोनालीका कंपनीचे मॅनेजर श्री.ओंकार कोळी, श्री.शुभम माळी तसेच समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर श्री.सोमनाथ केसकर तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.

चौकट

गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून समृद्धी ट्रॅक्टर काम करत आहे. शेतकरी ग्राहकांना नवनवीन योजना देत शेतकरीराजा सुखी समृद्धीमय व्हावा त्यामधून शेतकऱ्यांचे अर्थकारण उचवावे हाच प्रामाणिक प्रयत्न आहे. तरी सदर लकी ड्रॉ योजना ३०सप्टेंबर २०२३पर्यंत वाढीव करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान अमर पाटील यांनी सर्व शेतकर्‍यांना केले…

 

अमर पाटील, (कार्यकारी संचालक)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here