पंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर मध्ये भिमा नदिपात्रात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश

 

पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीमध्ये दोघेजण बुडाले असुन दोघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले आहे.पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामधील एकाला वाचविण्यामध्ये यश आले असून मात्र एकजण अद्यापही बेपत्ता असल्याचे समजते. प्रथमेश कुलकर्णी असे नदीमध्ये बुडालेल्या मुलाचे नाव आहे. चार वाजण्याच्या सुमारास चंद्रभागा नदीमध्ये चौघे जन पोहायला गेले असता त्यापैकी दोघे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले होते, मात्र यामधील एकाला वाच्विण्यामध्ये यश आले आहे.

चंद्रभागा नदीमधील पुंडलिक मंदिराजवळ हि धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या मुलाची शोध घेण्याची मोहीम सध्या सुरु आहे. हि घटना पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here