पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवार दि.०७/०३/२०२३ रोजी बेदाणा शेतीमालाची रु.२५०/- प्रति किलो या उच्चांकी दराने विकी झाली. बेदाण्याला रू.५० ते रू.
२५०/- व सरासरी रू.१६०/- प्रति किलो दर निघाला. बाजार समितीमधील बेदाणा आडते तुलसी ट्रेडींग कंपनी प्रो. विनीत बाफना यांचे दुकानी श्री.सुनिल बळीराम माने रा.बावी ता. माढा यांच्या बेदाणा या शेतीमालाला उच्चांकी रु.२५०/- भाव मिळाला. बेदाण्याची सुमारे १२० गाडीची आवक होवून बेदाणा ९५ गाडीची विक्री झाली. बेदाणा आवक चांगली असुन खरेदीदार व्यापारी मोठया संख्येने येत आहेत. अशी माहिती बाजार समितीचे सभापती मा. श्री. दिलीप (आप्पा) घाडगे व उपसभापती मा. श्री विवेक (काका) कचरे यांनी दिली.
पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकन्यांच्या सोयीसाठी बेदाण्याचे सौदे दर मंगळवार व शनिवार रोजी दुपारी १ वा. असतात. मालाला उठाव व मागणी चांगली आहे. व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल खरेदीसाठी येत आहेत. आवक चांगली असून, दर चांगला मिळत असल्याने शेतकरी माल विक्रीसाठी पंढरपूर बाजार समितीस प्राधान्य देत आहेत. शेतकरी बंधुनी जास्तीत जास्त माल विकी साठी पंढरपूर बाजार समितीमध्ये आणावा. सोलापूर जिल्हयाचे मा. आमदार मा. श्री. प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पंढरपूर बाजार समितीचे कामकाज उत्तम प्रकारे चालु आहे असे सभापती मा. श्री दिलीप (आप्पा) तुकाराम घाडगे व उपसभापती मा. श्री विवेक (काका) देविदास कचरे यांनी सांगीतले. यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. सोमनाथ डोंबे, उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशकाका कुलकर्णी, संचालक मा. श्री. शैलेंद्र नवाळे, मा.श्री सिकंदरभाई बागवान, मा. श्री. आबाजी शिंदे उपस्थित होते.