पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने आज धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांचे शुभहस्ते उपनगराध्यक्षा सौ श्वेता नीलराज डोंबे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, पक्षनेते अनिल अभंगराव,नगरसेवक राजू सर्वगोड, नगरसेवक डि.राज.सर्वगोड,उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट, मध्यवर्तीचे अध्यक्ष शिलरत्न झेंडे , बाळासाहेब कसबे,जितेंद्र बनसोडे, आप्पासाहेब जाधव,संतोष सर्वगोड व भिमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.