पंढरपूर ते कुरूल ति-र्हेमार्ग रस्त्याचे काम लागले मार्गी! खा.धनंजय महाडिक यांनी कामांचा लावला धडाका! पंढरपूर ते कुरूल ति-हे,मार्ग रस्त्याच्या कामास २०कोटी रूपयांचा निधी मंजूर:मुबीना मुलाणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर ते कुरूल ति-र्हेमार्ग रस्त्याचे काम लागले मार्गी!

खा.धनंजय महाडिक यांनी कामांचा लावला धडाका!

पंढरपूर ते कुरूल ति-हे,मार्ग रस्त्याच्या कामास २०कोटी रूपयांचा निधी मंजूर:मुबीना मुलाणी


राज्यसभा खा.धनंजय महाडिक व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या प्रयत्नातून पंढरपूर ते कुरूल ति-हे,मार्ग रस्त्याच्या कामास २०कोटी रूपयांचा निधी मंजूर मुबीना मुलाणी शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदेगट यांनी आता प्रयत्न करून या रस्त्याचे काम मार्गी लावले.

गेल्या तीस ते पस्तीस वर्ष रखडलेल्या पंढरपूर ते कुरूल तिर्हेमार्ग रस्त्याचे कामास अखेर निधी मंजूर.या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पंढरपूर, मोहोळ तालुक्याच्या गावातील नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको,झाले तसेच अनेकांचे या खराब रस्त्यामुळे अपाघात ही झाले‌.

मागील सरकारच्या काळात या रस्त्याच्या कामास स्थगिती मिळाली होती परंतु या शिंदे सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आरोग्य मंत्री मा.डॉ.तानाजीराव सावंत सर, राज्यसभा खा.धनंजय महाडिक, संपर्क प्रमुख मा.प्रा.शिवाजीराव सावंत सर यांच्या विशेष सहकार्यामुळे या रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठवून या रस्त्याच्या कामासाठी २०कोटी रूपये निधी मंजूर झाले असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्हाप्रमुख व मा पं स सदस्या मुबिना मुलाणी यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here