पंढरपूर ते कुरुल रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद! (लेखी निवेदन सादर करत बांधकाम मंत्र्यांना घातले साकडे)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गेल्या अनेक वर्षापासून सतत चर्चेत असूनही खड्डेमय आणि दूर्दशा कायम असलेल्या पंढरपूरचे कामती पर्यंतच्या ति-हे मार्गासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी पुळुज गावच्या पंचायत समिती सदस्य मुबिना मुलानी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.

पंढरपुर व सोलापूरला जोडणारा तिर्हे मार्ग मोठ्या रहदारीचा आहे. निम्म्यापर्यंत भीमा नदीशी समांतर असलेला हा एकमेव मुख्य रस्ता आहे. असे असूनही गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था कायम आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमुळे असून संबंधित विभागाकडून अधून मधून केवळ खड्डे बुजविण्याची मलमपट्टी केली जाते. मजबूतीकरणासह कामतीपर्यंत रस्त्याचे सलग काम पूर्ण करण्याची मागणी सातत्याने या भागातील लोकांकडून केली जात आहे.

यासाठी आजवर अनेक प्रकारची आंदोलने,उपोषणे झाली. मात्र, त्यानुसार शासन, प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य मुबीना मुलानी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुंबईत भेट घेऊन या रस्त्याचे गाऱ्हाणे पुन्हा नव्याने मांडले. त्यांनी लेखी निवेदन दिले.

या भागातील शेतकरी, विद्यार्थी तसेच पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना सोसावे लागणारे हाल त्यामध्ये नमूद करीत या रस्त्यासाठी पुरेसा निधी तााडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दरम्यान, ना. चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुबीना मुलाणी यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here