अनेक महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद निवडणूकसाठीचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार अंजली कुलकर्णी, कारकून तुकाराम गायकवाड, कन्याकुमारी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण सोडतीत अनेक नेत्यांना धक्के बसले आहेत. तर अनेक इच्छुक नेत्यांचे मार्ग आता मोकळे झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
भिमा परिवारातुन पुळुज जिल्हा परिषद गटामधुन हे सौ प्रिया महेश कांबळे या इच्छुक आहेत! भिमा परिवाराचे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार, धनंजय महाडिक साहेब हेच अंतिम निर्णय घेणार असून हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला असा आरक्षित झाल्यामुळे भीमा परिवाराचे युवा नेते महेश कांबळे यांच्या पत्नीच्या नावाची या गटामध्ये चर्चा असून त्यांनी आजपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवले आहेत; त्यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून या जिल्हा परिषद, गटातील सर्वच गावांमध्ये तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या नावाचे आकर्षण आहे. भीमा परिवारातून जर त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर; ते सहजरित्या निवडून येऊ शकतात असे आडाखे भीमा परिवारातील राजकीय विश्लेषक मांडत आहेत.
पंढरपूर तालुक्यात ५ जागा महिलांसाठी आरक्षण दिले तर ५जागा पुरुषांसाठी आरक्षण दिले आहे यामध्ये अनेक इच्छुकांचे मार्ग मोकळा झाला आहे तर अनेक नेत्यांना धक्के बसले आहेत.