पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील मधुकर सावंत यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत आढळला! 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील मधुकर सावंत यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत आढळला! 

(घटनेचा पंढरपूर तालुका पोलिसांकडून अधिक तपास सुरू)

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील एका गावातून 6 दिवसांपासून गायब असलेल्या व्यक्तीचा मृतदेह अतिशय भयंकर अवस्थेत आढळून आला. तालुक्यातील पिराची कुरोली या गावातील एका ५० वर्षीय व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अंगावरील कपड्यात दगड बांधून विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील मधुकर सावंत हे ११ ऑगष्ट रोजी कामानिमित्त घरातून बाहेर गेले होते. बाहेर गेल्यानंतर ते आपल्या घरी परतलेच नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते कोठेच आढळले नाहीत. अखेर सहा दिवसानंतर गावातील शांताबाई सावंत यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर मधुकर सावंत यांचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती समजली. ही माहिती कळताच नातेवाईकांनी जाऊन विहिरीत पाहिले असता सदर मृतदेह मधुकर सावंत यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. मयत मधुकर सावंत यांच्या डोक्यावर जखम असल्याचेही आढळून आले आहे. कुणीतरी मधुकर सावंत यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह विहिरीत टाकला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. खुनाच्या या घटनेमुळे पिराची कुरोली पंचक्रोशीत प्रचंड खळबळ उडाली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here