सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामध्ये मौजे गार्डी तालुका पंढरपूर येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा क्रमांक एक चे दुरुस्त केलेले काम एकाच मुसळधार झालेल्या पावसामुळे वाहून गेल्या आहे. यास कंपनीचे ठेकेदार असलेले सिग्मा कंपनी व या कंपनीकडून या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी मुंढेवाडी येथील अभय मोरे यांची नेमणूक करण्यात आली होती.
परंतू हे काम अभय मोरे यांनी केले असून ते काम संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना सोलापूर जिल्हा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सत्यवान मोरे यांनी तसेच समस्त गावक-यांनी केला आहे. या कामाची निविदा त्यावेळी ४०लाख ९६ लाख ४७५, एवढे असून त्यांनी वारंवार याबाबत, संबंधित त्या त्या विभागाला पत्र व्यवहार केला असून व वेळोवेळी सूचना केलेल्या असताना सुद्धा हे काम पूर्णत्वास नेले नाही त्यामुळे हा बंधारा पूर्णपणे वाहून गेला असून या संपूर्ण कामाची चौकशी करून संबंधित काम घेणाऱ्या ठेकेदारावर खडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा गार्डी ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
योवेळी सत्यवान (नाना) मोरे (उपजिल्हा प्रमुख शिवसेना), लोकनियुक्त सरपंच शिवकुमार फाटे, उपसरपंच रावसाहेब मंडले, माजी. सरपंच भारत निंबाळकर, नेते राजू बागल, उध्दव अनवर, तंटामुक्त अध्यक्ष शांताराम यादव, गुलबराव इनामदार, हनुमंत चव्हाण, चंद्रकांत फाटे, वसंत फाटे, आदी ग्रामस्त ग्रामपंचायत सदस्य तसेच अन्य गावकरी उपस्थित होते.