पंढरपूर तहसील कार्यालयाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तहसील कार्यालयाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

(पुळुज येथील 21 नागरिकांनी रक्तदान करून प्रशासनास केलेले सहकार्य)


सोलापूर // प्रतिनिधी

एखादा प्रशासकीय अधिकारी एखाद्या सामाजिक कार्यासाठी जर आव्हान करत असेल तर त्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे उभा राहणं गरजेचे असते. आणि त्या अधिकार्याला प्रतिसाद देणं गरजेचं असतं. याचाच प्रत्येय आज पंढरपूर मध्ये माननीय श्री सुशील जी बेल्हेकर तहसीलदार साहेब यांनी सुरू केलेल्या भव्य आणि दिव्य रक्तदान शिबिरात भाग घेऊन पुळूज गावांमधील जवळजवळ एकवीस व्यक्तीनी रक्तदान केले . अधिकारी कसा असावा याची चुणूक आज तहसीलदार साहेबांनी आज संबंध पंढरपूर तालुक्याला दाखवून दिली. बऱ्याच दिवसातून आज तहसील कार्यालयामध्ये जाण्याचा योग आला. सगळीकडे बदल पाहायला मिळाला . नवीन लावलेली झाडे असतील किंवा स्वच्छता असेल किंवा गाडीची पार्किंग असेल हा सगळा बदल आज पाहायला मिळाला आज खरं पंढरपूरचं तहसील कार्यालय हे तहसील कार्यालय नावाला शोभेल असं करून दाखवण्याचं काम आदरणीय तहसीलदार साहेबांनी केलेली आहे. .पंढरपूरचा तहसीलदार कार्यालय म्हटलं की सगळीकडे घाणीचे साम्राज्य अस्ताव्यस्त गाड्या लावलेल्या कोणाचा कोणाला मेळ नाही .आत जावा की नको असा प्रश्न निर्माण आत मध्ये व्हायचा पण हे सगळं बदलून दाखवण्याचं काम आदरणीय तहसीलदार साहेबांनी केलेले आहे. पंढरपुर तालुक्याला बऱ्याच दिवसातून सामाजिक भान असणारा अधिकारी मिळालेला आहे. खरं तर हा माणूस कामाचा आहे. आपल्या पदाचा कोणताही गर्व नाही. माझ्या सारख्या सरपंचांना सुद्धा अस्थेने विचार विचारपूस करून तुम्ही आल्याबद्दल आभारी आहे असं म्हणणारा अधिकारी पहिल्यांदाच पाहतोय धन्यवाद तसीलदार साहेब गर्व आहे तुमच्याबद्दल. आपलाच लोकनियुक्त सरपंच शिवाजी शेंडगे पुळूज

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here