पंढरपूर उपजिल्हा (सामान्य) रुग्णालयाचं नाव ‘आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रुग्णालय’ महर्षी वाल्मिकी संघाने लावला नामफलक  

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयाचं नाव ’आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रूग्णालय’ असं करण्यात आलंय. महर्षी वाल्मिकी संघाने याची घोषणा करत रूग्णालयावर या नावाचा नामफलकही लावला.

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात ज्या ठिकाणावरुन इंग्रजांनी अटक केली होती. त्याच्याच कांही अंतरावर असलेल्या एका चौकास आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नांव दिलेले आहे. त्या चौकाच्याच जवळ असणार्‍या सामान्य रुग्णालयासही आज आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नांव दिले आहे. अशी माहिती यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली.

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे हे आम्हा आदिवासी कोळी जमातीमधील वंदनीय महामानव असुन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अनमोल आहे. क्रांतीची मशाल घेऊन देशभरात देशभक्तीची ज्योत पेटवतानाच इंग्रजांनी त्यांना चंद्रभागेच्या पात्रात अटक केली आणि कांही दिवसानंतर त्यांना फाशी दिली. अशा या महान क्रांतीविराचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, तरुणाईला त्यांचा जाज्वल्य इतिहास माहित व्हावा या उद्देशाने आम्ही आज त्यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सामान्य रुग्णालयास त्यांचे नांव देत आहोत. जर कोणी या नामफलकास धक्का लावला किंवा हे नांव बदलण्याचा शब्द जरी काढला तर आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने जशास तसे उत्तर देऊ. असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला.

यावेळी संपत सर्जे, प्रकाश मगर, वैभव कांबळे, गणेश कांबळे, सुरज अभंगराव, नितेश म्हेत्रे, संदीप परचंडे, कृष्णा वाडेगावकर, गुंडू नेहतराव, शंभू नेहतराव, नवनाथ परचंडे, सुरज ननवरे, धनाजी कांबळे, वैभव कोळी, साहिल भंडारे, महेश कोळी, प्रविण कोळी यांचेसह असंख्य समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here