पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात:दिलीप धोत्रे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दि पंढरपूर अर्बन बँक पंढरपूरची निवडणूक जाहीर झाली असून आज बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आज पहिल्या दिवशी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत पंढरपूर अर्बन बँक बचाव समिती आघाडीच्या वतीने मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे यांचा उमेदवारी अर्ज अर्बन बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. दूरगुडे यांच्या कडे दाखल करण्यात आला आहे.दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँकेची निवडणूक गेली अनेक वर्षे झालीच नव्हती हे निवडणूक कधी जाहीर होत होती हे देखील सभासदांना कळत नव्हते. परंतु यावर्षी सत्ताधारी आघाडीच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र झाले असून ताकतीने ही निवडणूक लढवणार आहे. यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले बँक सुस्थितीत आणण्यासाठी, सभासद कामगारांना न्याय देण्यासाठी, ही निवडणूक आम्ही समविचारी आघाडीचे वतीने लढवणार आहोत असे दिलीप धोत्रे यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे झाली अर्बन बँकेने सभासदांना लाभांश दिला नाही, बँकेच्या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे बँकेचा एनपीए वाढला असून सभासदांना कर्ज देखील मिळत नाही .अनेक कामगारावर या ठिकाणी अन्याय झाला आहे. चुकीच्या पद्धतीने अनेक लोकांना कर्ज वाटप केल्यामुळे बँकेचा एनपीए वाढला आहे.

यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक लखन चौगुले ,नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक मोहम्मद उस्ताद ,राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील ,शहराध्यक्ष संतोष कवडे ,मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे ,युवा नेते प्रसाद कोळी, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अवधूत गडकरी ,ओंकार जाधव, राहुल पवार ,संतोष गायकवाड, आकाश रणदिवे ,मनसे विभाग अध्यक्ष नागेश इंगोले इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here