पंढरपूर अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न ! होतकरू व गरजू तरूणांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा-चेअरमन सतीश मुळे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न !

होतकरू व गरजू तरूणांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा-चेअरमन सतीश मुळे

पंढरपूर अर्बन बँकेस सन 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 29.09 कोटी इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे व सहकारी संचालक मंडळाचे वतीने 111 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये देणेत आली.

 

बँकेची 111 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या कर्मयोगी सभागृह, शाखा नवीपेठ, पंढरपूर येथे आज सोमवार 18 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. श्री.पांडुरंगचे व स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरवात करणेत आली. यावेळी बँकेचे कुटुंबप्रमुख मा.आ.प्रशांत परिचारक, बँकेचे सर्व आजी माजी संचालक, सभासद तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर, पत्रकार आदी उपस्थित होते. बैठकीपुर्वी उपस्थित सभासदांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेणेत आला. पंढरपूर अर्बन बँकेचा प्रधान कार्यालयासह 31 शाखा कार्यरत असून सुमारे 2500 कोटी पर्यंत व्यवसायवृध्दी झाली आहे. बँकेला कराव्या लागणाऱ्या तरतूद वजा जाता मार्च 2023 अखेर रू.56 लाख इतका नफा आहे. सभासदांच्या, ग्राहकांच्या विश्‍वासावरच बँक व्यवसायवृध्दी करीत आहे.

 

यावेळी बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी बँकेच्या सभेस उपस्थित असलेल्या सभासद व मान्यवरांचे स्वागत करून बँकेची आर्थिक परिस्थिती, सभेच्या नोटीशीतील ठराव व आलेल्या प्रश्‍नोत्तरांचे वाचन करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचित केले. श्री.उमेश विरधे यांनी अहवाल वाचन केले. यामध्ये सभासदांनी सभेच्या नोटीसीवरील विविध सर्व ठरावास आवाजी मतांनी मंजूरी देण्यात आली. संचालक श्री.हरिष ताठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सौ.माधुरीताई जोशी यांनी दिवगंत सभासद, हितचिंतक, ग्राहक यांना श्रध्दांजली वाहिली.

 

माजी नगराध्यक्ष श्री.सुभाष भोसले, श्री.संजय अभ्यंकर आदींनी प्रश्‍न विचारले होते. रामेश्‍वर यंपे गुरूजी यांनी संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झालेबद्दल सर्व सभासद, संचालक मंडळ व मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचे आभार मानले.

 

बँकेचे मार्गदर्शक कुटूंबप्रमुख श्री.प्रशांतराव परिचारक हे अहवाल सालातील संचालक मंडळाचे चेअरमन असल्याने त्यांनी सभासदांना मार्गदर्शन करावे अशी विनंती संचालक श्री.हरिष ताठे यांनी सांगितले. त्यावेळी सभासदांनी उपस्थित केलेले त्यांचे काळातील माहितीबाबत आश्‍वासक उत्तरे देत भविष्यात बँक आणखी सक्षमपणे ग्राहकाभिमुख सेवा राबवेल असे सुचित केले. सध्या बँकेने कर्जाचे व्याजदर हे स्पर्धेत टिकून राहणेसाठी 8.50% पर्यंत खाली आणले आहेत, त्याचाही ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. बँकेने आत्तापर्यंत लहान-मोठे व्यवसायिक, व्यापारी व उद्योजक यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणेसाठी विविध कर्ज योजना दिल्या आहेत. आता बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा योजना दिली आहे, त्याचा लाभ घेणेत यावा, असे आवाहन चेअरमन यांचे वतीने करणेत आले.

 

यावेळी बँकेचे संचालक रजनीश कवठेकर, राजाराम परिचारक, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, ऋषिकेश उत्पात, व्यंकटेश कौलवार, संगिता पाटील, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने, तज्ञ संचालक सीए अतुल कौलवार, प्रभुलिंग भिंगे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य उदय उत्पात, सोमनाथ होरणे, शुभम लाड तसेच सोलापूरचे सल्लागार संगम रघोजी, दिनकरभाऊ मोरे, सुधाकरपंत परिचारक साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, वसंतनाना देशमुख, दाजी भूसनर, लक्ष्मण पापरकर आदीमान्यवर तसेच सभासद, ठेवीदार, विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्राहक, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here