पंढरपूरात 26/11 शहिद दिनानिमित्त युवासेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न.!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूरात 26/11 शहिद दिनानिमित्त युवासेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न.!

पंढरपूरात 26/11 शहिद दिना निमित्त व शहिद मेजर कुणालगीर गोसावी यांच्या स्मरणार्थ पंढरपूरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर यांच्या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पोलीस – नाईक श्री प्रशांत कुंदूरकर साहेब यांनी शहिद वीर जवानांच्या प्रतिमेचे पूजन करून “भव्य रक्तदान शिबीराचे उदघाटन” केले. चला रक्तदान करूयात… शहिदांना आदरांजली वाहूयात… या ब्रिद वाक्यावर या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवकांनी या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करून शहिद वीर जवानांना आदरांजली वाहिली.

यावेळी माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, समाजसेवक अरूणभाऊ कोळी, शिवसेना शहरप्रमुख रविंद्र मुळे, समाजसेवक संजय बाबा ननवरे, उप-शहरप्रमुख तानाजी मोरे, लंकेश बुराडे, विभाग प्रमुख उमेश काळे, पिंटू गायकवाड यांनी या भव्य रक्तदान शिबिराला भेट दिली.

याप्रसंगी युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, समाजसेवक गणेश भिंगारे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप शिंदे, रोहित लाला पानकर, समाजसेवक कृष्णा कवडे, दत्तात्रय वाडेकर, भाऊ टमटम, शिवभक्त ग्रुपचे अध्यक्ष समाधान पोळ, तानाजीराजे गुंजाळ, राजेश नेमाडे, माऊली शिंदे, महेश कोरके, शिवक्रांती संघटनेचे शहराध्यक्ष माऊली चव्हाण, आनंद शिंदे, गणेश बारसकर, अमर उपळकर, भालेश टमटम, शुभम उपळकर, महेश डोळसे, बबलू वैरागकर, सोमनाथ रणदिवे, आकाश शिंदे, दत्ता सुतार, महेश पिसाळ, स्वागत कवडे आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here