पंढरपूरातील पोलिस निरीक्षकाच्या निलंबनासाठी आरपीआयच्या वतीने निदर्शने..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूरातील पोलिस निरीक्षकाच्या निलंबनासाठी आरपीआयच्या वतीने निदर्शने..!

सोलापुर // प्रतिनिधी

पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे व पोलीस कर्मचारी गणेश काळे यांचे निलंबन करा.या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे निलंबन करा तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा. अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान ‘सारेच पोलीस चांगले असतात भस्मे-काळे सारखे नालायक नसतात’ ‘बदली नको निलंबन करा’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
याबाबतचे निवेदन पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना देण्यात आले.
सदरचे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडी प्रदेश संघटक सचिव दिपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी समाधान बाबर, राजकुमार भोपळे, विजयकुमार खरे, दत्ता वाघमारे, महादेव सोनवणे, रवी भोसले, नाथा बाबर, दत्ता शिंदे, समाधान वाघमारे उपस्थित होते.

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे व कर्मचारी गणेश काळे हे मनमानी कारभार करीत आहेत.पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामुळे दलित व सवर्ण समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे.
गावगुंड, वाळूमाफिया, मटकाकिंग, अवैद्य दारू वाल्यांशी खात्यातील अधिकाऱ्यांचे संबंध दृढ झाले आहेत. सवर्ण समाजातील अवैध धंद्यांचे हित जोपासण्यासाठी दलित समाजावर किरकोळ गुन्ह्यांचे स्वरूप असताना गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. वरील संबंधित अधिकारी व कर्मचारी रुजू झाल्यापासून बेकायदेशीर धंद्यांना ऊत आला आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची मिलीभगत करून हप्ते वसुली करून त्यांनी लाखो रुपयांची माया जमवली असल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आला.
त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच सदर अधिकाऱ्यांची मालमत्तेची व आज पर्यंत केलेल्या कारवाईची सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे .

चौकट-

आरपीआयच्या आंदोलनाला यश.

पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांची तडकाफडकी बदली.

  1. आरपीआयच्या वतीने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे निलंबन करण्याबाबतची तक्रार करण्यात आली होते. याबाबत पंढरपूर तहसील समोर निदर्शने करण्यात आली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांची तडकाफडकी सोलापूर नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र पारित करण्यात आले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here