पंढरपूरच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाहि ः शिवाजीराव सावंत  

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरीच्या पांडुरंगासाठी लाखो भाविक येत असतात. त्या भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी सरकार कटीबध्द असून पंढरपूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नसल्याचे आश्वासन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी दिले.
पंढरपूर शहरातील प्रालंबित कामासंदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख विश्वजीत भोसले व पदाधिकारी यांच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद माळी यांना निवेदन देऊन पंढरपूर शहरातील प्रलंबित व नवीन विकास कामांच्या संदर्भात माहिती देऊन कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याची मागणी केली आहे. यानंतर पंढरपूरच्या विकास कामांबाबत भोसले यांनी संपर्कप्रमुख सावंत यांच्याशी संपर्क साधला आसता त्यांनी पंढरीच्या विकासासाठी निधी कमी न पडु देण्याचे आश्वासन दिले.  
 बाळासाहेबांची शिवेसनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे कि, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने लाखो भाविक भक्त येत जात असतात तरी या ठिकाणी असलेले खराब रस्ते , नागरिकांच्या विविध समस्या आहेत. या समस्यांमुळे नागरिकांसह येणार्‍या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. आलेल्या भाविकांना त्रास होवू नये म्हणून या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या अशी मागणी केली आहे.
निवेदन सादर करताना शहर संघटक वैभव पासलकर, उपसंघटक सचिन बंदपट्टे, उपशहर प्रमुख राहुल धोत्रे, अर्जुन माने व पदाधिकारी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here