पंढरपूरच्या गणेश शहाणे यांचे उत्तुंग यश भारतीय तिबेट सिमा पुलिस बलाच्या शपथग्रहणमध्ये बजावली सर्वोत्कृष्ट कामगिरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूरचे सुपुत्र असणाऱ्या परेड कमांडर सिपाही/जी. डी. गणेश विजय शहाणे यांनी 44 आठवड्याच्या कठीण प्रशिक्षण घेत असताना 525 जवानांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून पंढरपूरच्या    गौरवशाली परंपरेत मानाचा तुरा रोवलेला आहे. त्यामुळे पंढरपूरचा डंका भारताच्या तिबेट सिमेवर वाजलेला आहे.
विविध क्षेत्रात फिजीकल स्पोटर्स, वेपन हॅन्डलींग, शूटींग, ड्रील ऍण्ड ओवर ऍाल बेस्ट म्हणून आपली श्रेष्ठता सिद्ध करून 7 जवान पारितोषिक विजेते ठरलेले आहेत. यामध्ये पंढरपूरचे सुपुत्र गणेश विजय शहाणे यांनी सर्व क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून ओवर ऑल बेस्ट ठरलेले आहेत. त्यामुळे अनेकांतून त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
दिनांक 15 मार्च 2022 रोजी भारतीय तिबेट सिमा पुलिस बल (तामिळनाडू) येथे  दिक्षांत आणि शपथग्रहण समारोह परेड संपन्न झाला यामध्ये त्यांनी घवघवीत यश मिळविलेले आहे.
 यामध्ये भारतीय तिबेट सिमा पुलिस बलातील 525 जवान 44 आठवड्याचे कठीण प्रशिक्षण प्राप्त करून सहभागी झाले होते. यामध्ये सहाय्यक परेड कमांडर सीपाही/जी. डी. एस.बशीर अहमद (कुरणूल,आंद्रप्रदेश) हे सहभागी झाले होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here