उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते डिव्हिपी लायब्ररीचे उद्घाटन संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

पंढरपुरात DVP लायब्ररीचे पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री.विक्रमजी कदम साहेब, तहसीलदार श्री.सुशीलजी बेल्हेकर साहेब, संभाजी ब्रिगेडचे श्री. अमरजीतजी पाटील, मनसे नेते श्री.दिलीप बापू धोत्रे यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

अनेक तरूण-तरूणीं हे स्पर्धा परिक्षाकरिता पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर सारख्या ठिकाणी राहावं लागतं. तर काहीच्या खिशाला परवडणारी हि ठिकाणं नसतात. हिच बाब लक्षात घेऊन आपल्या डिव्हीपी स्केअर मध्ये लायब्ररी सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये लायब्ररीत २४तास तरूणांना प्रवेश देण्यात येईल, श्री.कदम साहेब व श्री.बेल्हेकर साहेब, श्री.गुरवसाहेब यासारख्या प्रशासन अधिकाऱ्यांनी देखील महिन्यातून एकदा येऊन तरूणांना मार्गदर्शन करण्याचे अवाहन केले. लोकोपयोगी उपक्रमात नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. यावेळी राजकीय, सामाजिक, तसेच सरपंच, तरूण मित्र उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here