पंढरपुरात मोहोळ न्यूज व तेज न्यूज चॅनल च्या कार्यालयाचे उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

पंढरपूर शहरातील इसबावी येथे आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा मोहोळ न्यूज व तेज न्यूज वेबपोर्टल व यूट्यूब चॅनल कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते फित कापून तर विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक गणेश अधटराव यांच्या हस्ते करून संपन्न झाला.

यावेळी प्रशांत परिचारक म्हणाले , डिजिटल मीडियाचे महत्त्व सांगून, पुर्वी बातमी देण्यासाठी नेमलेल्या माणसापांसून ते सध्याच्या डिजिटल मीडीया पर्यंतचा प्रवासाचा आवर्जून उल्लेख केला. सध्याचे युग हे डिजिटल युग असून वेब पोर्टल व युट्युब मुळे (डिजिटल मीडियामुळे) एका क्षणात भारत देशातील बातमी दुसर्‍या देशात तर दुसऱ्या देशातील बातमी भारत देशात प्रसारित (व्हायरल) होते. मोबाईल मुळे सगळी दुनिया आपल्या मुठीत आली आहे. त्यामुळे “कर लो दुनिया मुठ्ठी में”, तसेच सर्व जग मोबाईल मुळे हातात आले आहे. अशी समाजाची अवस्था बनली आहे. कोरोना कालावधीमध्ये शासनास कोरोनाचे अपडेट व त्यावरील प्रतिबंधात्मक सूचना देण्यासाठी डिजीटल मीडियाचा फार मोठा उपयोग झाला असल्याचेही आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

पूर्वी बातमी वाचकांजवळ पोहोचण्यासाठी बराच वेळ जात होता. तीच बातमी डिजीटल मीडियामुळे मोबाईलवर कधीही कुठेही पाहता येते. तसेच एकाचवेळी आणि अनेकांपर्यंत जलद माहिती पोहोचवता येते. याचा उपयोग व्यावसायिकांसाठी आपल्या व्यवसायाची जाहिरात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील डिजिटल मीडियाचा वापर होत आहे. असा उल्लेख प्रशांत परिचारक यांनी आवर्जून उल्लेख केला.

यावेळी शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,कर सल्लागार आनंता नाईकनवरे,माजी नगरसेवक गणेश भाऊ अधटराव, सनी मुजावर, उद्योजक विजयकुमार कादे, सतीश शिंदे, विजय भुसनर, समाधान लोखंडे, पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे, चैतन्य उत्पात, रवींद्र शेवडे, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वास पाटील, दत्तात्रय पाटील, विनोद पोतदार, अशपाक तांबोळी, सचिन कुलकर्णी, महिला पत्रकार सौ. नागटिळक, निवृत्ती चांडोले, दादा कदम महादेव भोसले, महादेव भोसले, संतोष रणदिवे, खिलारे सर, डॉ.श्रीधर यलमर,हुसेन मुलाणी, प्रवीण शहा,प्राची माळवदे इ. पत्रकार बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांनी तर सूत्रसंचालन सौ. सुरेखा भालेराव नागटिळक यांनी केले. तसेच सरस्वती फर्निचर चे मालक व पत्रकार प्रविण शहा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here