पंढरपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धविहार उभारणेकामी शासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविला अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार समाधान आवताडे यांचा आवाज बुलंद

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरीचे सांस्कृतिक वैभव संपन्न करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरणपूरक बुद्धविहार उभारणेकामी प्रश्न लावून धरला त्यास यश येऊन महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला असून प्रशासनाकडून योग्य दिशेने पाऊले उचलली जाऊ लागली आहेत. 

या सकारात्मक कामगिरीबाबत पंढरपुरातील विकासप्रेमी नागरिकांकडून समाधान व्यक्त करीत आमदार समाधान आवताडे यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, प्रदेश अध्यक्ष प्रशांत लोंढे, सचिव स्वप्नील गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रवि शेवडे, सदस्य राजन गायकवाड, विनोद लटके, शेखर भोसले, तानाजी कांबळे, कालिदास सोनवणे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here