पंढरपुरातील लसीकरण केंद्रावर ठाण मांडून बसणाऱ्या नगरसेवकांना आवरा,कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन थांबवा ! 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

   मनसे स्टाईलने धडा शिकविण्यात येईल मसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांचा इशारा!

 
पंढरपूर शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून लसीकरण केले जात असून शहरातील अरिहंत पब्लिक स्कुल येथील केंद्रावर लस घेण्यासाठी नागिरकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते.लसीकरणासाठी आलेल्या नागिरकांना तासनतास रांगेत थांबावे लागत असून तरीही लसीकरण सुरूच होत नसल्यामुळे नक्की आत चालले आहे तरी काय अशी शंका उत्पन्न होत आहे.अशातच काही नगरसेवक हे जणू लसीकरण केंद्रावर ठाण मांडून वशिलेबाजीस प्रोत्साहन देत असून या लसीकरणाच्या ठिकाणी कार्यरत काही कर्मचारी या सामान्य जनतेशी अतिशय उद्धट वर्तन करीत आहेत.हा प्रकार गंभीर असून सदर कर्मचाऱ्यांना  त्वरित हटवावे व या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नगरसेवक विनाकारण थांबून असल्याचे आढळून येते तर काही तथाकथित प्रतीष्ठीत नागिरक रांगेत न थांबता थेट लस घेऊन निघून जात असल्याच्या तक्रारी आहेत.हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा परिणामास सामोरे जाण्यास सज्ज रहा असा सज्जड इशाराच मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.       पंढरपूर शहरातील नागिरकांना गेल्या काही दिवसापासून शहरात सुरु असलेल्या लसीकरण केंद्राच्या बाबतीत अतिशय वाईट अनुभव येत आहे.नगर पालिकेच्या वतीने लसीकरणासाठीची यादी जाहीर केली जाते व दुसऱ्या दिवशी याच लोकांनी लस घेण्यासाठी येण्याचे आवाहन केले जाते.मात्र प्रत्यक्षात दिलेल्या वेळेत लसीकरण सुरूच होत नाही,वयोवृद्ध नागिरक तासनतास रांगेत थांबून असतात.मात्र याच वेळी काही तथाकथित प्रतिष्ठित नागिरक सहकुटूंब लसीकरण केंद्रात प्रवेश करून लस घेऊन बाहेर पडतात अशी रांगेतील नागिरकांची तक्रार असून हा प्रकार निषेधार्ह आहे.तरी नगर पालिका व पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई न केल्यास मनसे आपल्या पध्द्तीने या आंदोलन करेल असा इशारा प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here