पंढरपुरातील मुस्लिम समाजातील धार्मिकस्थळांची पाहणी करा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जमीर तांबोळी यांचे वक्फ बोर्डाचे चेअरमन व सीईओ यांना निवेदन

पंढरपूर – पंढरपूर शहरातील बडा कब्रस्थान व तांबोळी समाज पंढरपूर या धार्मिक स्थळांच्या 7/12 उताऱ्यावर पुर्वी असलेली ट्रस्टी असलेल्या व्यक्तींची नावे होती व ती भूमिअभिलेख कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून कमी केलेली असून मुस्लिम समाजातील मुर्शदबाबा र्दगाह, बडा व छोटा कब्रस्थान, तांबोळी जमातमधील, मुस्लिम समाज मंदिर या धार्मिक जागेच्या 7/12 वर मुस्लिम समाजातील प्रत्येक जमातीतील 1 व्यक्तींची ट्रस्टी म्हणून नेमणूक करण्यात यावी व त्या 7/12 उताऱ्यांवर त्यांची ट्रस्टी म्हणून नोंद करण्यात यावी व सध्या मुर्शदबाबा र्दगाह व छोटा कब्रस्थान या स्थळाच्या 7/12 उताऱ्यावर पुर्वीची नावे तशीच आहेत. याची संपूर्ण प्रत्यक्ष पाहणी करून विकासकामांसाठी योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी वक्फ बोर्ड महाराष्ट्र राज्य चे चेअरमन आ.डॉ.वजाहत मिर्झा साहेब औरंगाबाद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर निवेदनाद्वारे केली आहे.
यावर त्यांनी तात्काळ पंढरपूरच्या मुस्लिम समाजातील धार्मिक स्थळांची पाहणी करून त्या ठिकाणी प्रलंबित विकासकामे करणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पंढरपूर शहरामध्ये समाजाची लोकसंख्या वाढल्यामुळे इतर ठिकाणी कोणतीही जागा नसून फक्त मुस्लिम समाजाची सर्वात मोठी जागा मुर्शदबाबा र्दगाह येथील 80 गुंठे असून त्या जागेमध्ये मदरशा, टेक्निकल कॉलेज, कम्युनिटी हॉल, धर्मादाय रूग्णालय, मुलींचे शाळा वस्तीगृह, उद्यान, लग्नासाठी हॉल याच्या निर्मिती करावी तसेच वक्फ बोर्डाला राज्यातून मिळणाऱ्या पैशातून पंढरपूर शहरातील समाजातील प्रलंबित विकासकामे करावीत अशी मागणी शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी केलेली आहे.
तसेच संघटनेच्यावतीने 2017 पासून पायाभूत सुविधाअंतर्गत नगरपरिषद उर्द शाळा येथे कॉंक्रीटीकरण केले, बडा कब्रस्थान येथे एक हायमास्ट दिवा बसविला व अल्पसंख्यांक बहुलक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 2 खोल्या बांधणे व भिंतीची उंची वाढविण्यासाठी 14 लाख 73 हजार रूपयांचा विकासकामे मंजूर करण्यात आली व तो प्रस्ताव जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे. तसेच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी छोटा व बडा कब्रस्थान येथे दफनविधीचे साहित्य ठेवण्यासाठी प्रत्येकी 5 लाख असे एकूण 10 लाख रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
65 एकराशेजारील 2 एकर जागेचा प्रश्न प्रलंबित
रस्ता रूंदीकरणावेळी छोटा कब्रस्थान येथील जागा संपादित झाल्यानंतर त्याबाबत न्यायालयात वाद सुरू असताना पंढरपूर नगरपरिषदेने मुस्लिम समाजातील स्मशानभूमीसाठी गोपाळपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमी शेजारील 33 गुंठे व 65 एकर भक्तीसागर परिसरातील 2 जागा मुस्लिम समाजाला देण्यात आलेली आहे. त्यापैकी 33 गुंठ्यांवर गेट व कंपाऊंड करण्यात आलेले आहे मात्र 65 एकर शेजारील 2 एकर जागेमध्ये अजूनही काहीही केलेले नाही त्यामुळे त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वक्फ बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे जमीर तांबोळी यांनी केलेली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here