पंढरपुरातील मा. आमदार कै.औदुबर आण्णा पाटील, कै. सुधाकरपंत परिचारक व कै. भारत नाना भालके या सर्वांचे पुतळे, उभे राहणार!
पंढरपूर शहरात कै.मा.आ.औदुंबरआण्णा पाटील, कै. मा.आ. सुधाकरपंत परिचारक आणि कै.आ. भारतनाना भालके यांचे पुतळे उभारणेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, मल्हार आर्मी, शिवशंभो संघटना, धनगर समाज संघटना, मी वडार महाराष्ट्राचा या पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आली. या मागणीचे निवेदन नुकतेच पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले.
पंढरपूर शहर व तालुक्याच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांगिण विकासाच्या केलेले स्वर्गीय आमदार कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक आणि भारतनाना भालके या तीन लोकनेत्यांचे पुतळे पंढरपूर शहरामध्ये बसवणेची मागणी नागरिकांमधुन होत आहे. या तीनही लोकनेत्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत पंढरपूर तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी दिलेले योगदान हे सर्वसामान्यांना प्रेरणा देणारे असून येणार्या पिढीला त्यांच्याकडून स्फुर्ती मिळावी यासाठी या लोकनेत्यांचे पुतळे उभारावेत.
पंढरपूर-मंगळवेढा शहर व तालुक्यातील जनतेची सेवा करीत असताना कोरोना महामारीच्या आजाराला बळी पडून दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी या लोकनेत्यांनी बलिदानच दिलेले आहे. त्यामुळे नगराध्यक्षा यांनी दि.22 जुन 2021 रोजी सर्वसाधारण सभेच्या अजेंडावरील विषय क्र. 10 हा तहकुब ठेवून वरील तीनही माजी आमदारांचे पुतळे बसवण्यासाठी विशेष सभा घेऊन त्यामध्ये हा विषय मंजूर करण्यात यावा व संबंधित पुतळ्यांना ना हरकत देऊन जागा व चबुतरा बांधण्याची परवानगी नगरपरिषदेने द्यावी. तीनही पुतळे हे आमचे स्वखर्चातून देण्यास आम्ही तयार आाहोत असे निवेदनात नमुद केले आहे.
कोणत्याही प्रकारचे गट-तट न करता पंढरपूर शहरामधील (कै.) आ.भाई राऊळ यांच्या पुतळ्याजवळ या तीन लोकनेत्यांचे पुतळे बसविण्यासाठी विशेष सभा बोलवून मान्यता देण्यात यावी अशी मागणी विविध संघटना व पक्षांच्या वतीने करण्यात आली.