पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर भाविकांसाठी लॉकर व्यवस्था सुरू करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
श्रीक्षेत्र पंढरपूर हे महाराष्ट्राची दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेले तिर्थक्षेत्र असल्याने देशातील सर्व स्तरातील भाविक भक्त श्रींच्या दर्शनाला व चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्थान करण्यासाठी पंढरपूरात येत असतात. पण या ठिकाणी आल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेल्यानंतर त्यांनी ठेवलेले साहित्य चोरीला जात असल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत व सध्या देखील घडत आहेत. भाविकांनी आणलेल्या वस्तू किंवा सामानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे खूप मोठे नुकसान होवून येणारा भाविक आर्थिक अडचणीत सापडत आहे. तरी  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या माध्यमातून लॉकरची व्यवस्था  करण्यात यावी अशी मागणी पंढरपूरचे प्रांताधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
सदरचे निवेदन देताना राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष दादा थिटे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख तानाजी मोरे, मल्हार आर्मीचे संतोष बंडगर, समाजसेवक शहाजी शिंदे, शुभम मलपे आदि उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की, पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची अत्यंत चांगल्या पध्दतीने सोय करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतू नदीपात्रात किंवा नदीकडे जाणाऱ्या घाटावर लॉकरची सोय केली तर येणाऱ्या भाविकांची अजून चांगल्या प्रकारे सोय केल्यास त्यांचे भाविकांना समाधान होईल व त्यांचे होणारे नुकसानीपासून ते वाचतील व घडत असलेला चोरीचा प्रकार देखील थांबला जावू शकतो. असे ही या निवेदनात म्हटलेले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here